मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे निवडणुकीच्या निकालानंतर जरी स्पष्ट होणार असलं तरीही त्या संबंधित अनेक ओपिनियन पोल समोर येत आहेत. झी न्यूजच्या ओपिनियन पोलमधून अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपप्रणित एनडीएला 45 जागा मिळतील तर विरोधी आघाडीच्या 'इंडिया'ला केवळ 3 जागा मिळतील असं या सर्व्हेमधून सांगण्यात आलं आहे.
या ओपिनियन पोलमुळे महाराष्ट्रातल्या महायुतीला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून महाविकास आघाडीची चिंता मात्र वाढणार असल्याचं दिसतंय.
देशातील 543 पैकी 329 जागांचा सर्व्हेमध्ये आतापर्यंत स्पष्ट झाला असून त्यामध्ये एनडीएला 181 जागा मिळतील असा दावा यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील असं दिसतंय.
राष्ट्रवादीतील फुटीचा फायदा भाजपला
राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा हा भाजपला होणार असल्याचं या सर्व्हेमध्ये म्हटलं गेलं आहे. राष्ट्रवादीच्या फुटीमुळे मतदारांमध्ये कुणाला मत द्यायचं याबद्दल संभ्रम असल्याने ही स्थिती निर्माण होऊ शकते असं म्हटलं आहे.
इतर राज्यांचा सर्व्हे काय?
गुजरात-
- एकूण जागा - 26
- भाजप - 26
- इंडिया - 0
पश्चिम बंगाल
- टीएमसी - 24
- एनडीए - 17
- इंडिया - 1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचं कारण काय?
- कल्याणकारी योजना - 28
- राम मंदिर- 20
- अन्य- 9
- राष्ट्रवाद - 10
- भ्रष्टाचार मुक्त शासन - 33 टक्के
सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला फायदा
या उलट काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एबीपी सी व्होटर सर्व्हेमध्ये राज्यातील महाविकास आघाडीला फायदा होणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा असून जनमत चाचणीत महाविकास आघाडीचा वरचष्मा दिसत आहे. आज जर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली असती तर पोलनुसार भाजप महायुतीला+ 19-21 जागा मिळाल्या असत्या, तर महाविकास आघाडीला + 26-28 जागा मिळाल्या असत्या. इतरांना 0-2 जागा मिळाल्या असत्या. मतांच्या टक्केवारीनुसार, भाजपला + 37 टक्के, काँग्रेसला+ 41 टक्के आणि इतरांना 22 टक्के मते मिळतील.
कोणाला किती जागा?
- लोकसभेच्या जागा - 48
- भाजप+ 19-21
- काँग्रेस + 26-28
- इतर- 0-2
महाराष्ट्रात कोणाला किती मते?
- लोकसभेच्या जागाा- 48
- भाजप+ 37%
- काँग्रेस + 41%
- इतर - 22 टक्के
राज्यात लोकसभेला सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच मुकाबला होणार आहे. राज्यात मराठा आरक्षण कळीचा मुद्दा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका सुद्धा संतापात भर टाकत आहेत.
ही बातमी वाचा: