Dr. Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr Appasaheb Dharmadhikari)  यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Saha) यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (Maharashtra Bhushan Award) सन्मानित करण्यात आलं. यावेळी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या पुरस्काराचे मिळालेले 25 लाख रुपयांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची घोषणा आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केली.


आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. या सोहळ्यासाठी लाखो लोकांनी उपस्थिती दर्शवली आहे. 


शेवटच्या श्वासापर्यंत मी समाजसेवेचं काम करणार : आप्पासाहेब धर्माधिकारी


आज मला मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे  श्रेय हे आपल्या सर्वांना जात असल्याचे मत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. एका घरात दोन वेळा पुरस्कार दिला जातो अशी घटना कुठेही झाली नसल्याचे धर्माधिकारी म्हणाले. समाजसेवेचं काम हे कधीही पूर्ण होणार नाही. या कार्यासाठी आणखी आयुष्य मिळावं असे वाटत असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. शेवटच्या श्वासापर्यंत मी समाजसेवेचं काम करणार असल्याचे धर्माधिकारी म्हणाले.


 प्रत्येकाने पाच पाच झाडे लावावी, आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं आवाहन


समाजसेवा सर्वात श्रेष्ठ आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मी उभं केलं. त्यामार्फत मी काम केलं आहे. यामध्ये वृक्षारोपण आहे. ते काम करावं हे देखील सांगितले जाते.  प्रत्येकाने पाच पाच झाडे लावावी असे आवाहन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलं. माणवाने सदृ्ढ आयुष्य जगावं यासाठी आरोग्य शिबीर आपण घेतो. रक्तदान शिबीर आपण घेतो. रक्ताचा ज्याला गरज आहे त्याला मोठा उपयोग होईल. दुसऱ्याचे जीवन त्यामुळं वाचेल असे धर्माधिकारी म्हणाले. आपण सेवा म्हणून काम केलं पाहिजे. अखेरच्या श्वासापर्यंत मी समाजसेवंच काम सुरु ठेवणार असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. पाणी असते पण विकत घ्यावे लागते, त्यामुळं आपण पाणपोई उभ्या केल्या आहेत. ठिकठिकाणी आपण बस थांबे तयार करत आहोत. तसेच जलसंधारणाचे काम देखील आपण करत आहोत. पाणी वाचवण्याचे काम आपण केलं पाहिजे असे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Dr. Appasaheb Dharmadhikari : पुरस्काराचं श्रेय सर्वांना, शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेचं काम करणार : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी