बीड : बीडच्या राजकारणामध्ये क्षीरसागर यांच्या भाऊबंदकीची कायम किनार पाहायला मिळते. संघर्ष मग तो राजकीय आखाडामधला असो की व्यासपीठावरून होणाऱ्या जुगलबंदीचा संधी मिळेल तिथे हे राजकीय नेते एकमेकांना डिवचण्याची संधी अजिबात सोडत नाहीत.  बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर  यांनी एका भाषणात पुष्पा चित्रपटातील "मैं झुकेगा नही"  हा डायलॉग बोलून दाखविल्यानंतर त्याची  चर्चा झाली होती. आता संदीप यांचे चुलतभाऊ शिवसेना नेते योगेश क्षीरसागर यांनी मैं हूं डॉन हे गाणे गाऊन त्यांना डिवचले आहे. 


काही दिवसापूर्वी बीड शहरामध्ये एका छोट्याशा कार्यक्रमात बोलताना संदीप क्षीरसागर यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग झुकेगा नही म्हणून दाखवला आणि त्याचे बीडमध्ये मोठी चर्चा झाली.  मग काय आठवडाभराने बीडमध्ये नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसाचे औचित्य होते.  त्यावेळी संगीत रजनीचा कार्यक्रम सुरू होता यावेळी भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ. योगेश क्षीरसागर यांनी माईक हातात घेतला आणि व्यासपीठावर गेले आणि मै हु डॉन हे गाणं गाऊन प्रत्युत्तर दिले आहे. 


बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावतीने बीडमध्ये शिवजयंतीच आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील छत्रपती संभाजीमहाराज मैदानावर या शिवजयंतीचा सोहळा पार पडला यावेळी ढोल-ताशाच्या सुरात जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. यावेळी ढोल-ताशाच्या निनादात राष्ट्रवादीचे बीड चे आमदार संदीप क्षीरसागर यांनी हाती भगवा ध्वज घेऊन चांगलाच ठेका धरला होता


गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवजयंती साजरी करता आली नव्हती यावर्षी मात्र मोठ्या उत्साहात शिवजयंती बीडमध्ये साजरी झाली.  या जयंतीच्या निमित्ताने बीड करांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारा शिवाजी महाराज यांची यशोगाथा दाखवणारा लेझर शो त्याचबरोबर ढोल ताशा पथक आणि बाईक रायडर अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन संदीप क्षीरसागर यांनी केलं होतं. 


संबंधित बातम्या :


Shiv Jayanti 2022 : औरंगाबादमध्ये शिवरायांच्या देशातील सर्वाधिक उंच पुतळ्याचं अनावरण; क्रांती चौक उजळून निघाला


Shiv Jayanti 2022: 'शिवरायांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध'; पंतप्रधान मोदींकडून खास फोटो ट्वीट, राहुल गांधींकडूनही वंदन


Shiv Jayanti 2022 : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे? माहिती आहे का? पहिल्या पुतळ्याच्या निर्मितीची रंजक कहाणी