मुंबई मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने  महाराष्ट्र  बंद (Maharashtra Bandh)  असल्यच्या अफवा सोशल मीडियावर (Social Media Rumor)  अफवा पसरल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. काल दिवसभरात जाळपोळीचे प्रकार घडल्यानंतर आज मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याचे पोस्ट सोशल मीडियवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र असा कोणत्याही बंदची हाक देण्यात आलेली नाही, असा खुलासा मराठा समाजाकडून करण्यात आला आहे. 


महाराष्ट्र बंदबाबत व्हायरल होत असणाऱ्या मेसेजवर मराठा समाजाने भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र बंदचा कोणताही मेसेज जरांगे पाटलांकडून आलेला नाही. सर्वच जिल्ह्यात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबतच पोलिसांकडून अफवा न पसरवण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. 


मराठा क्रांती मोर्चाने कोणताही बंद पुकारलेला नाही


धाराशिव आणि बीड जिल्ह्यात सध्या संचारबंदी आहे. या दोन  जिल्ह्यात  अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे. हे दोन जिल्हे वगळता कोठेही बंद नसणार आहे. राज्य बंद आहे, अशी अफवा सर्वत्र पसरली. मात्र, मराठा क्रांती मोर्चाने कोणताही बंद पुकारलेला नसून असे सांगितले आहे.


सातारा बंद 


मराठा समाजाच्या वतीने  सातारा जिल्हा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.  मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही.  तोपर्यंत शेळत न जाण्याचा निर्धार केला आहे.  गावातील पहिली ते नववीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.


कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बस बंद


कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहे. पुढील आदेश येईपर्यंत बसची सेवा बंद राहणार आहे. महाराष्ट्रातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक परिवहन विभागाचा निर्णय घेतला आहे.  महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसेस टार्गेट केल्या जात असल्याने निर्णय घेण्यात आला आहे.  धाराशिव रेल्वे स्टेशनवर मराठा समाजाने आंदोलन पुकारले आहे. मराठा आंदोलकांकडून
रेल्वे रोकोचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.       


हे ही वाचा:


Maratha Reservation: मनोज जरांगे आजपासून पाणी पिणार, आंदोलक हिंसक होत असल्याने घेतला निर्णय