Aurangabad News: जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best Movie) मराठवाड्यातील (Marathwada) रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या आठव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (Ajantha Verul International Film Festivall) घोषणा करण्यात आलेली असून, आजपासून 15 जानेवारी 2023 या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, औरंगाबाद (Aurangabad) येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.


तर मराठवाड्यात जागतिक दर्जाचे लघुपट निर्माण व्हावे या हेतूने लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांतील स्पर्धकांसाठी ही स्पर्धा होती. यात मराठवाड्यातील एकूण 22 लघुपटांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून मुस्तजीब खान, किशोर निकम, नम्रता फलके व मयुर देवकर यांनी काम पाहिले. दरम्यान परीक्षकांद्वारे अंतिम सात लघुपटांची निवड करण्यात आली आहे. 


यामध्ये पडदा (दिग्दर्शक- के.रोहित रामास्वामी), कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का? (दिग्दर्शक - ओंकार कुलकर्णी), पाखर (दिग्दर्शक- सतीश दुधाडमल), लेव्हल (दिग्दर्शक- अनिकेत हरेर), दानपात्र (दिग्दर्शक - अभिजित चव्हाण), ग्रीनलँड (दिग्दर्शक - संदेश झा), कॉफी (दिग्दर्शक- करण वैद्य) यांचा समावेश आहे. तर अंतिम निवड झालेल्या लघुपटांचे विशेष प्रदर्शन चित्रपट महोत्सवात होणार असून, यातून अंतिम विजेत्याची निवड होणार आहे. विजेत्या लघुपटास रोख 25 हजार रुपये व सिल्व्हर कैलासा स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.


महोत्सवासाठी यांचेही सहकार्य... 


नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र औरंगाबाद प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ (औरंगाबाद) इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून मनजीत प्राईड ग्रूप व प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी,सूचना व प्रसारण मंत्रालय,भारत सरकार व सांस्कृतिक कार्य विभाग,महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. नाथ स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (एनएसबीटी), अभ्युदय फाउंडेशन हे या महोत्सवाचे सहआयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे नॉलेज पार्टनर आहेत.


आठही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद 


महोत्सवात मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणार्‍या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील अंतिम स्पर्धेसाठी निवडलेल्या शॉर्ट फिल्म या ज्युरी कमिटीने निवडलेल्या शॉर्टफिल्म महोत्सवा दरम्यान दाखविण्यात येतील. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला 25 हजार रुपये रकमेचे रोख पारितोषिक व सिल्व्हर कैलासा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.