मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत 35 हजार 788 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून 1400 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली. तर मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. राजकोटवरच्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी राज्य सरकारकडून 36 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत पुरवणी मागणी मांडली.
विधानसभेत मांडलेल्या पुरवणी मागण्यांत निधीची तरतूद
- सहकारी आणि खाजगी दूध संघांना प्रती लिटर 5 आणि 7 रुपये अनुदान यासाठी 758 कोटी रुपये.
- प्रधानमंत्री पिक विमा योजना यासाठी राज्याचा हिसा म्हणून 814 कोटी रुपये तरतूद.
- मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 2 हजार 750 कोटींची तरतूद.
- यंत्रमाग वस्त्रोद्योग विज सवलतीसाठी 300 कोटी रुपये.
- सरपंच वाढीव मानधन यासाठी 128 कोटी.
- सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसीठी 890 कोटी रुपयांची तरतूद.
- अदिवासी विकास विभागाला 1813 कोटी रुपये तरतूद.
- लाडकी बहिण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची अतिरीक्त तरतूद करण्यात आली आहे.
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 290 कोटी रुपयांची तरतूद.
- ओबीसी समाजासाठी मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी रुपयांची तरतूद.
- मुंबई मेट्रो तीनसाठी 655 कोटी रुपयांची अतिरीक्त तरतूद.
- राज्यातील रस्ते व पुलासाठी 1500 कोटी रुपयांची अतिरीक्त तरतूद.
- इमारती, रस्ते, पुल बिनव्याजी कर्जातून बांधण्यासाठी 3195 कोटी रुपयांची तरतूद.
- राजयातील वैधकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी 1170 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद.
- सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन देण्यासाठी 1204 कोटी रुपयांची अतिरिक्त निधीची तरतूद.
- राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी 36 कोटी रुपयांची अतिरीक्त तरतूद.
लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद
लाडक्या बहिणींसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. मात्र, मासिक लाभ 1500 वरुन 2100 करण्याची अजूनही तरतूद करण्यात आली नाही.
ही बातमी वाचा: