नागपूर:  नागपूर हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session) आज चौथा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. आजही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी  आमदार निवासातील व्हीडिओ ट्वीट केला आहे.  


 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी  आमदार निवासातील व्हिडीओ ट्वीट केलाय. यात एक वेटर  आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातलं पाणी वापरत असल्याचा आरोप मिटकरी यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. हजारो कोटींचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.






महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कोरोनामुळे सलग दोन वर्ष नागपुरात अधिवेशन झाले नाही.  दोन वर्षानंतर नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) पार पडत आहे. त्यानिमित्ताने देखभाल दुरुस्ती, सुविधेसह विविध कामांसाठी  कोटींची निविदा काढण्यात आली होती. इतके कोट्यवधी खर्च केल्यानंतर देखील  आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातलं पाणी वापरत असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. 


राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले,  घडलेला प्रकार छोटा असला तरी गंभीर आहे. या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 


आजच्या चौथ्या दिवशी नागपुरात (Nagpur) 12 मोर्चे निघणार आहेत. यातला पोलीस पाटील संघटनेचा मोर्चा महत्वाचा असणार आहे. तसेच कोकणातील रिफायनरी (Refineries) विरोधक आज नागपुरात एक दिवसाच आंदोलन केलं जाणार आहे. 54 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आता आज सभागृहात पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात येणार आहेत.