Eknath Shinde Annoncement : शिंदे-फडणवीस सरकारनं 164  सदस्यांचा पाठिंबा मिळवत विधानसभेतील बहुमत चाचणी आज जिंकली. विधानसभा अध्यक्ष निवडीपाठोपाठ बहुमत चाचणी जिंकून सरकारनं विरोधी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आणि पहिला टप्पा पार केला. मुख्यमंत्र्यांनी समारोपाच्या भाषणावेळी तीन मोठ्या घोषणा केल्या.  राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरचा कर लवकरच कमी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.  हिरकणी गाव वाचवण्याकरता 21 कोटींचा निधी मंजूर केलाय. तर शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत 



  • हिरकणी गाव वाचवण्याकरता 21  कोटींचा निधी मंजूर 






रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी  21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे.



  • पेट्रोल आणि डिझेलवरीलल व्हॅट कमी करण्याचा  निर्णय


केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली. त्याच धरतीवर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल. त्यामुळे त्याचा फायदा हा राज्यातील जनतेला होणार आहे. येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येणार आहे.







  • शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा शिवसेना-भाजप युती सरकारचा निर्धार


 शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र व्हावा, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा.  जलयुक्त शिवार सारथे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल करण्याचा संकल्प सरकारने केला आहे. 






 


संबंधित बातम्या :


Eknath Shinde : राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच कमी करणार, जनतेला दिलासा देणार; एकनाथ शिंदेंची घोषणा


 CM Eknath Shinde: संतोष बांगर शिंदे गटाकडे कसे गेले? खुद्द CM एकनाथ शिंदे यांनीच सांगितले


Eknath Shinde : अन्यायाविरोधात बंड केला, आता माघार नाही; एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे