Assembly Monsoon Session :  'ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली हे त्या ठिकाणी मदतीचा हात आपण देत आहे', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत (Vidhansabha) म्हटलं आहे. पंतप्रधान किसान योजनामध्ये राज्य सरकारने भर टाकली असल्याची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली आहे. तर 'आमचं सरकार फक्त दिखावा करत नाही' असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सभागृहात दिले आहे. सभागृहात मुख्यमंत्री शिंदे यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेविषयी देखील भाष्य केलं आहे. 


'शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई देणार'


तर ज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे त्यावर चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात म्हटलं आहे. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दहा हजारांची मदत करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 'केंद्राने देखील राज्याला योग्य पाठबळ दिलं आहे. ज्यांच्या व्यवसायाचे नुकसान झाले आहे त्यांना 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे', असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. 


आम्ही जो निर्णय घेतला आहे तो जनतेच्या हितासाठी घेतला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. ज्यांचं हातावर पोट आहे त्यांच्या हितासाठी देखील सरकारने निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर कृषी सेवक यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. कृषी सेवक यांचं मानधन सहा हजार होते ते सोळा हजार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहाला दिली आहे. 


'आम्ही वर्क फाॅर्म होम काम करणारे नाही'


मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की,  'वर्क फाॅर्म होम काम करणारे नाही. आम्ही रस्त्यावर उतरुन काम करणारे आहोत. आम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत' तर 'केंद्राने जे पैसे दिले त्याचा वापर आम्ही जनतेसाठी केला आहे, स्वत:चे घर भरण्यासाठी नाही केला', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 


अजित पवार सरकारमध्ये येणं म्हणजे बूस्टर डोस : मुख्यमंत्री शिंदे


'आमचं डबल इंजिन हे ट्रीपल इंजिन झालं आहे. त्यामुळे आमच्या कामाचा देखील वेग वाढला आहे. म्हणून काही लोकांची पोटदुखी होत आहे', असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होणं म्हणजे सरकारला बुस्टर डोस मिळण्यासारखं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे. आम्ही अंहकार बाजूला ठेवून जनतेसाठी काम करतो असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Assembly Session : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानाची भरपाई 30 दिवसात द्यावी, दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर