मुंबई : विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा 22 दिवस होणार आहे. 3 ते 25 मार्च असा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असणार आहे 11 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून प्रलंबीत बिल आणि मागण्या यावर पाच दिवस चर्चा होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.  कोरोनामुळे अधिवेशन मुंबईत पार पडणार आहे. तर यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.


अनिल परब म्हणाले, दोन्ही सभागृहातील सदस्य संख्या पाहता नागपुरात बैठक व्यवस्था नसल्यानं मुंबईत हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात विदर्भावर अन्याय होणार नाही. आज संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय  घेण्यात आला आहे. 


वर्ष 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळायला लागले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अधिवेशन गुंडाळण्यात आले होतं. एक वर्षांनी पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी  केला. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत. अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत हेणार आहे. त्यामुळे ठिकाण बदलल्यामुळेर विरोधक आक्रमक  झाले आहे. 


महाविकास आघाडी सरकार आपला  तिसरा अर्थसंकल्प यावेळी मांडणार आहे. मान्सून असो किंवा हिवाळी अधिवेशन त्याचे कामकाज  कमी दिवस चालले होते. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी पूर्ण काळ चालावे अशी विरोधकांची अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे लोकसभेचं कामकाज चालतं त्यानुसार इथलंही कामकाज चालावं अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यामुळे एकूणच अर्थसंकल्पीय अधिवेशन किती दिवस चालणार? कामकाज कसं असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha