Jan Dhan Yojana :  केंद्र सरकारकडून जन धन खात्याची योजना सुरु करण्यात आली होती. तुम्हीही हे अकाऊंट सुरु केलं असेल, तर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा अगदी सहज लाभ घेऊ शकता. कोणत्याही योजने अंतर्गत सरकार थेट लोकांच्या खात्यात पैसे जमा करते, त्या सर्व योजनांचे पैसे प्रथम जन धन खात्यात ट्रान्सफर केले जातात. 


जन धन खातेधारकांना 3000 मिळतात :
सरकार जन धन खातेधारकांना दरमहा पूर्ण 3000 रुपये ट्रान्सफर करते. या सरकारी योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असे आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात. जन धन खातेदारालाही या योजनेचा लाभ मिळतो.


36000 रूपये वार्षिक उपलब्ध होतील :


केंद्र सरकारच्या मानधन योजनेत 18 वर्ष ते 40 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती सहभागी यामध्ये सहभागी होऊ शकते. या खातेधारकांना वार्षिक 36000 रुपये मिळतील. जेव्हा एखादी व्यक्ती 60 वर्षांची होते, तेव्हा या योजनेचे पैसे त्याच्याकडे ट्रान्सफर केले जातात. यामध्ये वर्षाला 36000 रुपये ट्रान्सफर होतात. 


कोणाला मिळतो लाभ?


असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळतो. पथ विक्रेते (स्ट्रीट वेंडर), मध्यान्ह भोजन कामगार (मिड-डे मील वर्कर), हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर इ. या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय तुमचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. 


या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक


या योजनेचा फायदा घेम्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमचे जन धन खाते असणे देखील आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या सेविंग अकाऊंटचे डिटेल्ससुद्धा सबमिट करावे लागतील.    


किती प्रीमियम भरावा लागेल?
या योजनेअंतर्गत, वेगवेगळ्या वयोगटानुसार, दरमहा 55 ते 200 रुपये योगदान द्यावे लागेल. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर तुम्हाला दरमहा 55 रुपये द्यावे लागतील. 30 वर्षांच्या व्यक्तींना 100 रुपये आणि 40 वर्षांच्या व्यक्तींना 200 रुपये भरावे लागतील. या योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या बचत बँक खात्याचा किंवा जन धन खात्याचा IFSC कोड आवश्यक असेल. याशिवाय तुमच्याकडे आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.



नोंदणी कशी करावी ?


या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी , एखाद्याला जवळचे सामान्य सेवा केंद्र म्हणजेच CSC शोधण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर IFSC कोडसोबत आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जन धन खात्याची माहिती द्यावी लागेल. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून दाखवता येईल. 


तुमचा तपशील कॉम्प्युटरमध्ये टाकताच तुम्हाला तुमच्या मासिक योगदानाची माहिती मिळेल. यानंतर सुरुवातीचे योगदान रोख स्वरूपात द्यावे लागेल. खाते उघडल्यानंतर तुम्हाला श्रम योगी कार्ड मिळेल. LIC, स्टेट एम्प्लॉईज इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC), EPFO ​​किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार कार्यालयात जाऊन देखील अर्ज केला जाऊ शकतो. काही राज्यांमध्ये कामगार विभाग स्वतः नोंदणी मोहीम राबवत आहे.


महत्वाच्या बातम्या :


Sensodyne Naaptol Ads: नापतोल, सेन्सोडाइनच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या,  ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून नोटीस


Cryptocurrency : भारतात क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता मिळणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha