मुंबई : जगभरात धुमाकूळ घातलेला कोरोना व्हायरस आता महाराष्ट्रातही धडकला आहे. त्यामुळे ठरलेल्या तारखेनुसार 20 मार्चपर्यंत अधिवेशनाचं कामकाज सुरू ठेवायचं की आधीच उरकायचं याबाबत उद्याच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 10 वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलवण्यात आली आहे.

अधिवेशनात राज्यभरातून लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा वावर असतो. विविध कामांसाठी गाव खेड्यातून विधिमंडळ येत असतात. सध्या पुण्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने राज्याभरात कोरोना व्हायरसचा प्रसार आणि लागण होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून नेटाचे प्रयत्न केले जात आहेत. जनजागृतीसोबतच आरोग्य विभागाकडून सर्वोतपरी दक्षता घेतली जात आहे.

मात्र गर्दीचे ठिकाण आणि लोकसंपर्क टाळण्याच्या सूचना जरी शासनाकडून दिल्या जात असल्या तरी विधिमंडळाच्या कामकाजामुळे सरकारच या सूचनांना हरताळ फासत नाही ना असा प्रश्न काही लोकप्रतिधी आणि अधिकाऱ्यांकडून उपस्थित होत आहे.

त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे मूळ उद्धिष्ट असलेलं अर्थसंकल्प सादर करण्यात आलं आहे. आता फक्त अर्थसंकल्पला मान्यता देणं बाकी आहे. या आठवड्यात अर्थसंकल्प विधिमंडळात पास झाल्यास याच आठवड्यात अधिवेशनाचे कामकाज पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे आजच्या कामकाज सल्लागार समितीत याविषयी चर्चा करून सर्वपक्षीयांच्या सहमतीने निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Coronavirus | पुण्यातील दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर, दोघांच्या संपर्कात आलेल्या सर्वाची तपासणी सुरु : विभागीय आयुक्त

कोरोनाचे राज्यात पाच रुग्ण तर मुंबईत एकही रुग्ण नाही : राजेश टोपे

कोरोना व्हायरसच्या सद्यस्थितीबाबत बुधवारी सकाळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. सध्या राज्यात पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. वीणा टूर्समधून जे कुणी परदेशी गेले होते, त्यांच्या संपर्क झाला आहे. त्यांच्या सर्वांच्या तपासण्या सुरु आहेत. तसेच कोरोनाबाबत पाच सदस्यीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. एकट्या सार्वजनिक आरोग्य खात्यावर ताण येऊ नये म्हणून गृह खातं, महसूल, वैद्यकीय, शिक्षण खात्याचे अधिकारी एकत्र काम करतील, असं टोपे यांनी सांगितलं.

Corona Virus | कोरोनाग्रस्त ड्रायव्हरचा मुंबई- पुण्यात कुठं-कुठं प्रवास ?



कोरोनाची लक्षणे कोणती आहेत ?

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.

कोरोनाबाबत काय काळजी घ्याल?

तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | इराणच्या जेलमधून 70 कैद्यांना सोडले, तर भारतात कोरोना बाधितांची संख्या 55

Coronavirus | राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात