1. महाराष्ट्रात आतापर्यंत पाच कोरोनाग्रस्त, पुण्यातल्या दाम्पत्याच्या मुलीसह विमानातल्या सहप्रवाशाला लागण, मुंबई ते पुणे प्रवास करणाऱा टॅक्सीचालकही कोरोनाग्रस्त

    2. कोरोनासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, आयपीएलसह, अधिवेशन कामकाजाबाबत निर्णय होण्याची शक्यता

    3. साडे चारशे वर्षात पहिल्यांदाच पैठणचा नाथषष्ठी सोहळा रद्द, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय, अंबाबाईच्या दारावर निर्जंतुकीकरण यंत्रणा, इगतपुरीतली शिबिरंही रद्द

    4. एबीपी माझाचा लोगो वापरून कोरोनासंदर्भात अफवा, उस्मानाबादमधल्या प्रकारानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

    5. तिरादित्य शिंदे यांच्यासह मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या 22 आमदारांचा राजीनामा, कमलनाथ सरकार धोक्यात, उर्वरीत आमदारांना आज काँग्रेस भोपाळमधून जयपूरला हलवणार






  1. दिल्लीतल्या दंगलीवर लोकसभेत आज चर्चा, गृहमंत्री अमित शाह चर्चेला उत्तर देणार, विरोधी पक्षांकडून केली होती चर्चेची मागणी

  2. मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर सामनातून टीका, मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी शॅडो राज्यपाल नेमण्याचाही खोचक सल्ला

  3. बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा एकच बाप शरद पवार, गणेश नाईकांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांची सडकून टीका

  4. सहलीला गेलेल्या कुटुंबाची बोट तापी नदीच्या बॅकवॉटरमध्ये उलटून 15 जण बुडाले; दोघांचा मृत्यू, सहा जणांचे प्राण वाचवण्यात यश तर आठजण बेपत्ता

  5. पुण्यात धुळवडीच्या उत्साहाला गालबोट, चतुःशृंगी परिसरात रंग खेळताना दोन गटात राडा, गाड्यांची तोडफोड