Shiv Sena Whip : निवडणूक आयोगाने (Eleection Commission) नाव आणि पक्षचिन्ह शिंदेंना दिल्यानंतर आता शिंदे आणि ठाकरेंमध्ये शह-काटशहाचं राजकारण सुरु आहे. कालच शिवसेनेतर्फे (Shiv Sena) विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांना पत्र देत शिवसेनेचा प्रतोद नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रतोदपदी विप्लव बजोरिया यांच्या नावाचा ठराव शिवसेना विधिमंडळ पक्षात झाल्याचं या पत्रातून सूचित करण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदेंकडून पहिला वार करण्यात आल्याचं बोललं जातं आहे.


उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील विधान परिषदेतील आमदारांना नव्या प्रतोदाचा व्हीप मान्य करावा लागणार, अन्यथा कारवाईची टांगती तलवार कायम आहे. ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडण्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला वार करण्यात आला आहे.




मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वास ठराव आणण्याची ठाकरे गटाची तयारी


अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra A ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरु असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वास ठराव आणण्याची ठाकरे गटाकडून तयारी करण्यात आली आहे. विधानपरिषदेत महाविकास आघाडीचे संख्याबळ अधिक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप करत देशद्रोही म्हटले होते.


सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न


राज्याचं अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session 2023)  सुरु आहे. आज दुसऱ्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याने विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचा जाहिरातींवर आणि वर्षा निवासस्थानातील चहापाणावरील वारेमाप खर्च, जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटप यावरुन शिंदे गटातील आमदारांची चाललेली मनमानी अशा वेगवेगळ्या विषयांवरुन विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या विरोधी पक्षातील आमदारांनी सांगितलेली अनेक काम थांबवण्यात आल्याचा  आरोप विरोधी पक्षाने केला आहे. 


शेतमालाचे गडगडलेले दर, पीकविमा, वीजबिल, पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant warise) यांची हत्या अशा अनेक मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जोरदार गोंधळाचीही शक्यता आहे शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. 25 मार्चपर्यंत अधिवेशन आहे. देवेंद्र फडणवीस 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023)  मांडणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकिटही बूक केलं होतं, एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला; भाजपच्या मोहित कंबोज यांचा गौप्यस्फोट