अमरावती : त्रिपुरामधील (Tripura Violence) घटनेच्या निषेधार्थ काल झालेल्या हिंसाचारानंतर अमरावतीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दुपारी 2 नंतर अमरावती शहरात संचारबंदी (Curfew in Amravati) लागू करण्यात आली आहे. संचारबंदी लागू झाल्याने याचा फटका ‘एम्स आयएनआय सीईटी 2021’ च्या विदर्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर न पडण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहे. अमरावती शहरात संचारबंदी लागू झाल्याने ‘एम्स आयएनआय सीईटी 2021’ फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. एम्स आयएनआय सीईटी 2021 च्या मेडीकलच्या परीक्षेसाठी अमरावती केंद्र आहे. ही परीक्षा उद्या (14 नोव्हेंबरला) पार पडणार आहे. शहरात संचारबंदी लागू झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
एम्समध्ये एमडी, एमएस, डीएम (6 वर्षे), एमसीएच आणि एमडीएस सारख्या पदव्युत्तर वैद्यकीय कोर्समध्ये प्रवेश मिळविण्यासाठी इंस्टीट्यूट ऑफ नॅशनल इंपोर्टंस कम्बाईंड एंट्रंस टेस्ट((INI CET)होते. जे उमेदवार 'आयएनआय सीईटी 2021' मध्ये पात्र ठरतात त्यांना एम्समध्ये शिकण्याची संधी मिळते अशा विद्यार्थ्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे.
संचारबंदी कालावधीत कोणीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडणार नाही. तसेच, पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नये. तसेच या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल. हा आदेश आजपासून संपूर्ण अमरावती शहरासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.
अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे की, कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये. अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल. याला कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी शांतता राखावी. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. तसेच गृहमंत्री स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
संबंधित बातम्या :
विनाकारण घराबाहेर पडू नका! संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 गुन्हा भविष्यात अडचणीचा ठरणार
Amravati violence Update : अमरावतीत बंदला हिंसक वळण, दगडफेकीनंतर पोलिसांकडून जमावावर लाठीचार्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha