Akola : तुमच्या लहान मुलांना खायला देत असलेल्या चॉकलेट्स मध्ये भांग असल्याचे तुम्हाला समजले, तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण अकोल्यात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळकरी मुलांच्या चॉकलेट मध्ये भांग आढळली असून, या चॉकलेटच्या रॅपर मधून भांग विक्रीचा अजब प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना अकोल्यातील आहे.


चक्क शाळकरी मुलांच्या चॉकलेट रॅपर मध्ये भांग


अकोल्यात भांग विक्रीचा अजब-गजब प्रकार समोर आलाय. चक्क चॉकलेटच्या रॅपरमध्ये ही भांग विक्री होत असल्याचं समोर आलंय, समाजसेवक विनय सरनाईक यांच्या निदर्शनास आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. सरनाईक हे न्यायालयीन कामानिमित्त अकोला न्यायालयात जात असताना लहान शाळकरी मुलांच्या हातात हे चॉकलेट दिसले, ते वेगळे चॉकलेट थोडं आगळंवेगळं असल्याने चॉकलेटची तपासणी केली. चक्क शाळकरी मुलांच्या चॉकलेट रॅपर मध्ये भांग दिसून आली. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून याकडे संबंधित विभागात तसेच पोलीस प्रशासन लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी ही त्यांनी घातली आहे. 


 


हेही वाचा>>>


Chandrapur Crime: तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर हादरलं! कौटुंबिक कलहातून पतीने केली चक्क पोटच्या मुलींसह पत्नीची निर्घृण हत्या