मुंबई : कोरोनाच्या विळख्यात राज्यातील निवासी डॉक्टरही सापडले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 291 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वाधिक सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरबाधित झाले आहे. तब्बल 80 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.
जे.जे. रुग्णालयात आत्तापर्यंत 59 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नायर रुग्णालयात 40, केईएममध्ये 40 डॉक्टरांना कोरोनाची लागण झालीय. काही जणांना डिस्चार्ज मिळाला असला तरी अद्याप विलगीकरणात आहे. नायर रुग्णालय 45, केईएम 60, ठाणे 8, धुळे 8, कुपर 7, पुण्यातील ससून रुग्णालय 5, मिरज 2, लातूर, औरंगाबाद, नागपूर येथील प्रत्येकी एका निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टर कोरोनाबाधित होत असल्याने पुढील पाच ते सहा दिवस जिकरीचे ठरणार आहे. कंत्राटी पद्धतीच्या डॉक्टरांच्या नेमणुकीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण पडणार आहे.
कोरोना काळात वैद्यकीय सेवा देताना अनेक डॉक्टरांना गेल्या दोन लाटेत कोरोनाची लागण झाली. मात्र आता नव्या विषाणूची संसर्गक्षमता अधिक असल्याने डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झपाट्याने होत आहे.
पदव्युत्तरच्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे नीटचे समुपदेशन रखडल्याने 27 नोव्हेंबरपासून देशभरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चा झाल्यानंतर देशातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले.
Maharashtra Corona : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, आजचा आकडा 26 हजार 538
महत्त्वाच्या बातम्या :
- COVID-19 Vaccine : 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण; असा बुक करा स्लॉट
- कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशीच्या कॉकटेल डोसचा परिणाम काय? रुग्णालयाच्या चाचणीत केला मोठा दावा
- ओमायक्रॉनच्या संकटात चांगली बातमी; 2 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी Covaxin सेफ, भारत बायोटेकची माहिती