सोलापूर : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. यात महाविकास आघाडीतल शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत पॅनेलला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या पक्षाला सर्वाधिक यश मिळाल्याचे दावे केले आहेत. या निकालात 85 वर्षांच्या आजीबाई देखील विजयी झाल्या आहेत. राजकारणात तरुणांचा सहभाग वाढावा असं म्हटलं जातं. या निवडणुकीत तरुणाईनं देखील उत्साहानं सहभाग घेतला. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या घाटणे येथील 21 वर्षाचा तरुण ऋतुराज रवींद्र देशमुख यांनी विजय मिळवत सर्वांत तरुण विजयी उमेदवार होण्याचा मान पटकवला आहे.


Maharashtra Gram Panchayat Election Results | चंद्रकांत पाटलांना गावही राखता आलं नाही, शिवसेनेचा सहा जागांवर विजय


ऋतुराज सध्या 21 वर्षाचा असून नुकतेच त्याचे बीएससीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता तो LLB ला प्रवेश घेणार आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ऋतुराजने आपल्या घाटणे गावात निवडणुकीसाठी स्वत:चं पॅनेल उभं केलं होत. निवडणुकीच्या काळात ऋतुराजने तयार केलेला वचननामा चर्चेचा विषय ठरला होता. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतःचा वचननामा तयार करून गावच्या विकासाचा रोडमॅप सांगणारा ऋतुराज पहिलाच असावा.


मोठी बातमी! सरपंचपदाची आरक्षण सोडत कधी? हसन मुश्रीफांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...


ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लोकनेते बाबुराव अण्णा पाटील ग्रामसमृद्धी पॅनलकडून त्याने निवडणूक लढवली. ऋतुराजने ग्रामसमृद्धी पॅनेलअंतर्गत 7 जागांवर उमेदवार उभे केले. त्यापैकी 5 जण विजयी झाले आहेत. स्वतः ऋतुराजला 103 मतं मिळाली असून त्यांच्या विरोधात 66 मतं आहेत. तर सदस्य म्हणून निवडून आलेल्या ऋतुराजला सरपंचपद भूषवण्याची संधी मिळणार का? हे आरक्षण सोडत निघाल्यानंतरच कळू शकेल. पण अशी संधी मिळाली तर तो राज्यातील सर्वाधिक तरुण वयाचा सरपंच ठरेल.


संबंधित बातम्या
Gram Panchayat Election Results 2021 | हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांचं वर्चस्व, सातही जागांवर विजय


Gram Panchayat Election Results | अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटीलच 'दादा', माळशिरसमध्येही 44 पैकी 35 ग्रामपंचायतींवर वर्चस्व


Maharashtra Gram Panchayat Election Results | चंद्रकांत पाटलांना गावही राखता आलं नाही, शिवसेनेचा सहा जागांवर विजय


औरंगाबादमधील पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात; 25 वर्षांनंतर गावात सत्तांतर


Gram Panchayat Election Result : विजयानंतर गुलाल उधळणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोप