Nashik Crime : एकीकडे नाशिक शहरात (Nashik) नोटा छपाईचा कारखाना आहे, त्याच नाशिक शहरात बनावट नोटा (Fake Money) वारंवार आढळून यात आहेत. काही दिवसांपूर्वी इडलीवाल्या अण्णांकडे बनावट नोटा आढळून आल्या होत्या. त्यानंतर आता एका भाजीवाल्याला ग्राहकाने फसवल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 


नाशिकमध्ये गुन्हेगारीचे अनेक फंडे समोर येत असून काही दिवसांपूर्वी इडलीवाल्या अण्णांचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता. तब्बल पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. या बनावट नोटा बाजारात चलनात आणताना पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर आता नाशिक शहरातील सिडको भागात भाजीपाला विक्रेत्यास ग्राहकाने बनावट नोट देत फसवणूक केली आहे. त्यामुळे परिसरातील इतर विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. सिडको परिसरातील उपेंद्र नगर भाजी मार्केट येथील लाल रंगाचे स्वेटर प्रदान केलेल्या एकाने पाचशे रुपयांच्या नकली नोटा बाजारात आणून त्या भाजी विक्रेत्यांना दिली.  आहे. 


सिडको भागातील उपेंद्रनगर परिसरात हि घटना घडली आहे. एका भाजी घेणाऱ्या ग्राहकाने विक्रेत्याला पाचशे रुपयांची बनावट नोट देत फसवणूक केली आहे. सुरवातीला या ग्राहकाने फक्त 20 ते 30 रुपयांचीच भाजी विकत घेत उर्वरित पैसे स्वतःच्या ताब्यात घेत पसार झाला. पुढे जाऊन घेतलेला भाजीपाला एका कोपऱ्यात फेकून देत यांनी पलायन केले. पाचशे रुपयांची नकली नोट देत भाजीपाला विकत घेतला. थोड्यावेळाने भाजी विक्रेते जाधव यांनी ही नोट निरखून पाहिली असता ही नोट साध्या कागदावर कलर झेरॉक्स करून एकमेकांना चिकटवलेली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर भाजीपाला विक्रेत्याची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. 


दरम्यान घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन भाजीपाला विक्रेत्याने या व्यक्तीचा शोध घेतला असता तो तिथून पसार झाल्याचे समजले. तसेच भाजीपाला दुकानाच्या थोड्या अंतरावर फेकून दिलेला असताना देखील दिसून आला. त्यानंतर ही व्यक्ती पवन नगर किंवा बाकी ठिकाणी बाजारात जाऊ शकते. अनुषंगाने जाधव यांनी ही बाब परिचित लोकांना तात्काळ कळवत असा व्यक्ती निदर्शनास आल्यास त्याच लागलीच पोलिसांच्या स्वाधीन करावे किंवा पोलिसांना सुचित करावे असे आवाहन देखील केले आहे. 


इडलीवाला बनावट नोटा 
नाशिकमध्ये (Nashik) नोटा छपाईचा कारखाना आहे, त्याच नाशिक शहरात बनावट नोटांचे (Fake Money) रॅकेट उघडकीस आले होते. विशेष म्हणजे बनावट नोटा एका  इडलीवाल्याकडे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. तब्बल पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या तब्बल 244 पोलिसांनी जप्त केल्या होत्या. या बनावट नोटा बाजारात चलनात आणताना पोलिसांनी कारवाई केली हतोय. त्यानंतर सिडकोच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.