सांगली : राज्यात बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या नियमांचे पालन सांगली जिल्ह्यात करण्यात येत आहे. मात्र शासनाने इतर राज्यातून अंडी आणि कोंबड्या आयात करण्यावर बंदी घालावी अशी मागणी पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात अद्याप कुठेही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नाही, मात्र बर्ड फ्लूच्या भीतीने अंड्याच्या दरावर परिणाम झाला आहे.


देशात बर्ड फ्लूची साथ उद्भवली आहे, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून संबंधित जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये पोल्ट्री धारकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या सांगली जिल्हामध्ये बर्ड फ्लूचा कोणताही धोका नाही, तरी देखील धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोल्ट्री धारकांच्याकडून योग्य खबरदारी, कोंबड्यांना लसीकरण करण्यात येत आहे.


बर्ड फ्ल्यूच्या धर्तीवर अंड्यांच्या दरावर सध्या परिणाम झालेला आहे, त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता पोल्ट्री धारकांकडून वर्तवण्यात येत आहे. राज्य शासनाने तेलंगणा तसेच इतर राज्यांनी ज्याप्रमाणे अंडी आणि कोंबड्या निर्यातवर बंदी घातली आहे, त्याप्रमाणे राज्यात पोल्ट्री आणि कोंबडी आयातीवर बंदी घालावी अशी मागणी पोल्ट्री धारकांनी केली आहे.


राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

राज्यात बर्ड फ्लूनंही शिरकाव केला आहे. रविवारी परभणीच्या मुरुंबा गावातील 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं होतं. अशातच आता परभणीपाठोपाठ मुंबई, ठाणे, बीड, तसेच रत्नागिरीतील दापोलीतही बर्ड फ्लू पोहोचल्याचं निष्पन्न झालं आहे.

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात

राज्य अगोदरच कोरोनच्या संकटाशी सामना करत आहे, अशातच आता नवीन संकट उभं राहिलंय, ते बर्ड फ्लूच्या रूपात. परभणीच्या मुरुंबा गावातील 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं असून बीड आणि लातूर मधील अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत. दरम्यान राज्य शासनाने या घटनेनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त केल्या आहेत. तसचे ग्रामपंचायत, वन विभाग, पाटबंधारे विभाग पातळींवर निगराणीचे आदेशही दिले आहेत.


संबंधित बातम्या :