Unseasonal Rain पुणे : राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार हजेरी लावत एकच दाणादान उडवली आहे. या अवकाळी पावसासह, सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना (Crop Loss) बसला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आधीच कंबरडे मोडले असताना दुष्काळात तारलेली पिके वादळी वाऱ्याने ओरबाडून नेली आहेत. दोन दिवसापूर्वी इंदापूर (Indapur) तालुक्यात वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. त्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे.


या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका इंदापूर (Indapur) तालुक्यातील केळी उत्पादकांना बसलाय. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या केळी बागांसह लहान बाग देखील जमिनीवर अक्षरक्ष: आडव्या झाल्या आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अवसानच गळालं असल्याचे चित्र सध्या शेतकऱ्यांमध्ये बघायला मिळत आहे. 


केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अवसानच गळालं 


कांदलगाव येथील शेतकरी विठ्ठल फाटे या शेतकऱ्यांने दोन एकर क्षेत्रावर केळीची बाग लावली. केळी विक्री योग्य झाली आणि अचानक वादळी वाऱ्याने हजेरी लावत घात केला. हाता तोंडाशी आलेला घास वादळी वाऱ्याने हिसकावून घेतला. तर दुसरीकडे इंदापूर तालुक्यातील शिंदेवाडी परिसरात केळीच्या बागा ज्या तोडणीच्या परिस्थितीत होत्या. त्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशांत निंबाळकर यांची केळी प्रति किलो 14 रुपये दराने बुधवारी तोडणीला जाणार होती. परंतु त्या अगोदरच वादळ आल्याने मोठे नुकसान झाले. एकट्या निंबाळकर यांचा उत्पादनाचा खर्च तीन लाख रुपये वाया गेलाय.


तर त्यातून त्यांना जवळपास दहा ते अकरा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते, त्यावर देखील पाणी फेरल्या गेलं आहे.  इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी, कंदलगाव, माळवाडी आणि उजनी पट्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. इंदापूर तालुक्यात जवळपास 20 हेक्टरवर केळीचे नुकसान झालं असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.


रायगडमध्ये जोरदार अवकाळी पाऊस 


रायगड जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अवकाळी पावसामुळे मात्र आंबा बागायतदार आणि जांभूळ पीक घेणारे शेतकरी चिंतेत आहेत. रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाला आहे. रायगडच्या महाड, माणगाव, पोलादपूर , म्हसळा श्रीवर्धन भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. लोनेर परिसरात गारांचा पाऊस कोसळला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या