मुंबई : अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) राज्यातील शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे. या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ, कोकणात  अवकाळी पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा केळी, आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. कुठे झाडं कोसळले तर कुठे विजेचे खांब पडले, कुठे रस्ते बंद झाले आहेत. अवकाळीने शेतकऱ्यांना  मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेलं घास निसटल्याने शेतकरी बळीराजा चिंतेत आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरामध्ये गुरुवारी अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला. या वादळी पावसामुळे आंबा बागायतदारम बरोबरच खेड तालुक्यातील वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांच्या केळीच्या आणि पपईच्या बागांना देखील मोठा फटका बसला आहे.  25 एकर होऊन अधिक क्षेत्रात असणाऱ्या पपई आणि केळीच्या बागा अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत.  हजारो पपईंची आणि केळीची झाडे मोडून अक्षरशः चिखलात पडलेली पाहायला मिळत आहे.  एका बाजूला आंबा बागायतदार उद्ध्वस्त झालेत त्याच बरोबर कोकणात नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.  कोकणातील प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांच्या शेतातील केळी आणि पपई ची हजारो झाडे जमीनदोस्त झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने करमाळा तालुक्यातील केळी बागांचे मोठे नुकसान 


काल रात्री करमाळा तालुक्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने मिरगव्हाण, हिवरे,वांगी नंबर 2 आदि गावात केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.  यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून  भरपाई देण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत .


अवकाळी पावसाचा केळी उत्पादकांना फटका


पुण्याच्या इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा केळी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या केळी बागांसह लहान बागाचं नुकसान झाले आहे. तालुक्यात जवळपास 20 हेक्टरवर केळीचे नुकसान झाल्याची माहिती आहे.  इंदापूर तालुक्यातील केळी उत्पादकांना मोठा फटका बसलाय. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या केळी बागांसह लहान बाग देखील जमिनीवर आडव्या झाल्या. कांदलगाव येथील शेतकरी विठ्ठल फाटे या शेतकऱ्यांने दोन एकर क्षेत्रावर केळीची बाग लावली. केळी विक्री योग्य झाली आणि वादळी वाऱ्याने घात केला हाता तोंडाशी आलेला वादळी वाऱ्याने हिसकावून घेतला. तर दुसरीकडे इंदापूर तालुक्यातील शिंदेवाडी परिसरात केळीच्या बागा ज्या तोडणीच्या परिस्थितीत होत्या. त्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. 


हे ही वाचा :


Unseasonal Rain : विदर्भात अवकाळी पावसाचा धूमाकूळ सुरूच; अनेक झाडे उन्मळून पडली, शेतमालाचेही प्रचंड नुकसान