Mahadev Jankar : भाजपसोबत (BJP) युती करणे ही आमची चूक होती, कारण, त्यांनी आम्हाला धोका दिल्याची टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केली.  फुले शाहू आंबेडकर यांचे राज्य देशावर असायला हवे असेही जानकर म्हणाले.  ज्यांनी धोका दिला त्यांना परास्त करणार असल्याचा इशारा देखील जानकरांनी दिला आहे. 

Continues below advertisement


सपकाळ साहेब आपली युती होऊ शकते 


मी अजित पवारांकडे युती करण्याचा प्रयत्न केला होता, पण काय झालं माहिती नाही असेही जानकर म्हणाले. दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली होती. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना महादेव जानकर यांनी काँग्रेससोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. आपली युती होऊ शकते सपकाळ साहेब असं वक्तव्य जानकर यांनी केलं आहे. 


जयंती तो बहाना है, दिल्ली मे सरकार लाना है 


आज राहुल गांधी, शरद पवार येणार म्हणाले होते पण आले नाहीत. हर्षवर्धन सपकाळ आल्याचे जानकर म्हणाले.  हर्षवर्धनजी हमे लंबा चलना है, जयंती तो बहाना है, दिल्ली मे सरकार लाना है असे म्हणत महादेव जानकर यांनी सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे इशाराच दिला आहे. 


निधन झाल्यावर माझा मृतदेह दिल्लीतच राहणार 


निधन झाल्यावर माझा मृतदेह दिल्लीतच राहणार असल्याचे महादेव जानकर म्हणाले.  राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची बॉडी कराडला गेली होती.  तर माजी राष्ट्रपती अब्दुल कलम यांची बॉडी त्यांच्या गावी गेली होती. पण माझी बॉडी दिल्लीतच राहणार हा माझा शब्द असल्याचे महादेव जानकर म्हणाले. 


विधानसभेला अपेक्षीत जागा न मिळाल्याने जानकर युतीतून पडले होते बाहेर 


महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. पण त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाही असं लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी स्वतंत्र त्यांचे उमेदवार उभे केले होते.  सत्तेत एकच पक्ष जास्त वेळ राहिला तर ते लोकशाहीला धोक्याचं असल्याचे जानकर म्हणाले होते. तसेच भाजप हा जुमला पक्ष आहे. त्यामुळं यापुढं भाजपसोबत जाणार नसल्याचे जानकर म्हणाले होते.


महत्वाच्या बातम्या:


भाजप हा जुमला पक्ष, यापुढं त्यांच्यासोबत जाणार नाही, महादेव जानकरांचा हल्लाबोल, म्हणाले छोट्या पक्षांनी एकत्र यावं