Punjabrao Dakh : राज्यातील वातावरणात (maharashtra Weather) हळूहळू बदल होत आहे. गेल्या काही दिवसापासून सुरु अअसलेला पावसाचा जोर कमी आला आहे. काही भागात तुरळक पाऊस होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर राज्यात कसं हवामान राहिल? याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांनी दिली आहे. 31 मे पासून ते 6 जून पर्यंत जोराने वारं सुटणार आहे. या काळात पाऊस येणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी 6 जून पर्यंत पेरणीसाठी शेतजमिनीची मशागत करुन ठेवावी असं आवाहन पंजाबराव डख यांनी केलं आहे.
राज्यात 7, 8, 9 आणि 10 तारखेला भाग बदलत बदलत पाऊस पडणार
दरम्यान, पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडाभर राज्यात पावसाची शक्यता नाही. मात्र, परंतू या काळात जोराचा वारा सुटणार असल्याची माहिती डख यांनी दिली आहे. राज्यात 7, 8, 9 आणि 10 तारखेला भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे. मात्र, राज्यात 6 जून पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. आजपासून जोराने वारं सुटणार आहे. त्यामुळे राज्यात चांगलं सूर्यदर्शन राहील अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार
राज्यात 7 आणि 8 जूनला पूर्व विदर्भ, पश्चिमी विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश, मराठवाडा या सगळ्या विभागामध्ये पाऊस पडणार आहे. 7 जून ते 10 जून च्या दरम्यान असलेला पाऊस दररोज भाग बदलत पडणार असल्याचे डख म्हणाले. दरम्यान, पंजाबराव डखांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होते. तसेच नदी नाले या पावसामुळंं देथडी भरुन वाहिलेत. अनेक ठिकाणी धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. त्यामुळं आता पावसानं उघडीप दिली तर शेतकऱ्यांना खरीपाची पेरणी करणं शक्य होणार आहे.
दरम्यान, यावर्षी मान्सून 12 दिवस लवकर देशात दाखल झाला आहे. तसेच महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे. त्यामुळं ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांची सुटका झाली आहे. पण दुसऱ्या बाजुला या पूर्वमोसमी पावासाचा काही भागात शेती पिकांना देखील फटका बसला आहे. त्यामुळं सध्या काही भागातील शेतकरी चिंतेत आहे.
महत्वाच्या बातम्या: