Amravati Ladki Bahin Yojana :  महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही एक जुलैपासून राज्यभरात सुरू केलीय. या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया (Offline Application Process) कालपासून सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी 15 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.


अमरावतीत (Amravati News) लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी कार्यालयात काल महिलांकडून पैसे घेत असल्याची बातमी एबीपी माझाने सर्वात आधी दाखवली होती. या बातमीची दखल घेत आज अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तलाठी तुळशीराम कंठाळे यांच्यावर कारवाई करत तडकाफडकी निलंबन  करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी याबत आदेश देत ही कारवाई केली आहे.  


जिल्हाधिकाऱ्यांकडून तडकाफडकी निलंबनाची कारवाई 


महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक जुलैपासून राज्यभरात सुरू केलीय. या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी 21 ते 30 वर्षे वयोगटातील महिला पात्र असून याकरता जिल्ह्यातील तलाठी कार्यालय तसंच शहरी भागात तहसील कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी 15 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान अमरावती शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचे बघायला मिळाले.


दरम्यान, वरुड येथे या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तुळशीराम कंठाळे हे तलाठी चक्क महिलांकडून पैसे वसूल करत असल्याचा हा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओ तलाठी महिलांकडून पैसे उकळत असल्याचे दिसून आले. दरम्यान ही बातमी एबीपी माझाने सर्वात आधी दाखवली होती. तर आता या बतमीची दखल घेत अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तलाठी तुळशीराम कंठाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करत दणका दिला आहे.  


सेतू सुविधा केंद्रात महिलांची गर्दी


शासनाने नेव्याने सुरू केलंल्या माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्या अनुषंगाने अधिवास आणि उत्पन्नचा दाखला काढण्यासाठी महिलांची सेतू केंद्रात मोठी गर्दी केल्याचे चित्र सकाळपासून पहावयास मिळत आहे. यातही लाडकी बहिण याची साईट बंद आहे, तर सेतू केंद्राचे सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज घेण्यास महिलांना दीड ते दोन तास  लागत आहे. अधिवास दाखवण्यासाठी महिलांना जन्मचा दाखल्याची अट असल्याने अनेक महिलांना अडचण निर्माण झाली आहे. अशातच या योजनाचा कालावधी हा 15 दिवसाचा आहे. त्यामुळे योजनेतील अटी शिथिल करून योजनेचा कालावधी वाढवावा, अशी मागणी महिला करीत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या