मुंबई : मुंबईसह राज्यभरात ओखी वादळाचा परिणाम जाणवू लागला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यातील ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच गोवा, औरंगाबादमध्ये पाऊस कोसळत आहे.


LIVE UPDATE :

  • ओखी चक्रीवादळ मुंबई समुद्रकिनाऱ्यापासून 200 किमी अंतरावर

  • शिवाजी पार्कातील दूरवस्थेबद्दल गायक नंदेश उमप यांची नाराजी, चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी स्पीकर लावण्याची विनंती

  • महापरिनिर्वाणदिनावरही ओखी वादळाचं सावट, पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये चिखल, महापालिकेच्या 70 शाळांमध्ये भीमसैनिकांच्या राहण्याची सोय

  • समुद्रातील उधाणामुळे जाळी, दोरी, शिसे वाहून गेल्याने सिंधुदुर्गात मच्छिमारांचं लाखोंचं नुकसान, तर वेंगुर्ल्यात आठ नौका बुडाल्या

  • ओखीच्या प्रभावामुळे मुंबईत दुपारनंतर पाऊस आणि वाऱ्याचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा इशारा

  • विरार : पावसाचा मच्छिमारांना फटका, अर्नाळा बीच आणि अर्नाळा किल्ल्यातील वाळत घातलेली लाखो रुपयांची सुकी मच्छी वाहून गेली


  • ओखी वादळाचा तडाखा : दुपारी 3 नंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

  • 4 आणि 5 डिसेंबरला मासेमारांनी समुद्रात जाऊ नये! - आपत्ती व्यवस्थापन विभागाचं आवाहन

  • https://twitter.com/CMOMaharashtra/status/937559643173384193

  • ओखी वादळामुळे कोसळणाऱ्या मध्यम सरीच्या पावसात मुंबईत कामं सुरु असलेल्या रस्त्यांची चाळण, मुंबई उच्च न्यायालयासमोरील मुख्य चौकात खड्डेच खड्डे


  • रत्नागिरी - लाटांच्या तडाख्याने गणपतीपुळे मार्गावर असलेल्या तिवरी बंदराकडे जाणारा रस्ता वाहून गेला


  • मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात झाड कोसळल्याने वाहतूक मंदावली, दोन जेसीबीच्या मदतीने झाड बाजूला करण्याचं काम सुरु

  • दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला, दादर, सीएसटी , वरळी, परळ भागात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी पावसाचा वाहतुकीवर परिणाम

  • 24 तासातील पावसाची नोंद
    सांताक्रूझ वेधशाळा : 22 मिमी
    कुलाबा वेधशाळा : 23 मिमी
    अलिबाग : 21 मिमी
    ठाणे : 14 मिमी
    डहाणू : 13 मिमी
    माथेरान : 14 मिमी
    पुणे : 3 मिमी
    महाबळेश्वर : 4 मिमी
    सातारा : 4 मिमी

  • मरिन ड्राईव्हवरचा आढावा




------------------

मुंबई : मुंबईसह राज्यभरात ओखी वादळाचा परिणाम जाणवू लागला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यातील ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच गोवा, औरंगाबादमध्ये पाऊस कोसळत आहे.



मुंबई, उपनगर, ठाणे, कल्याण, पालघरमध्ये सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. कालपासून सुरु असलेल्या पावसाने अद्यापही विश्रांती घेतलेली नाही.

मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच समुद्रकिनारी मोठ्या लाटा उसळण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. आजच दुपारी 12.43 वाजता 4.35 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, ओखी वादळ आता उत्तर महाराष्ट्रासह दक्षिण गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात ताशी 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



दादर चौपाटीकडे जाणारे रस्ते बंद
दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क इथल्या चैत्यभूमीवर आजच भीमबांधव दाखल होणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तवर दादर चौपाटीकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं, असं आवाहन महापालिकांकडून करण्यात आलं आहे.

ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅम
मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पश्चिम द्रूतगती महामार्ग, ईस्टर्न फ्रीवे आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवर वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.



मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने
मुंबईत सुरु असलेल्या पावसाचा परिणाम लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर झाला आहे. मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या गाड्या दहा मिनिटं उशिराने धावत आहेत.

ओखीमुळे शाळांना सुट्टी
ओखी चक्रीवादळाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज (मंगळवार 5 डिसेंबर) मुंबईसह परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

https://twitter.com/TawdeVinod/status/937692404320051200

मुंबई, उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

देवगड बंदरात 1200 बोटी


देवगड बंदरात आतापर्यंत एकूण 1200 बोटी दाखल असून यात सिंधुदुर्गमधील 800 तर परराज्यातील 400 बोटींचा समावेश आहे.
कोकण किनारपट्टीवरील सुरक्षित बंदर म्हणून या देवगड बंदराकडे पाहिलं जातं. समुद्रात अजूनही बोटी येण्याचं प्रमाण वाढत आहे. परंतु देवगड बंदराची क्षमता पूर्ण झाली आहे, मात्र गुजरातमधील बोटी इथे दाखल होत आहेत. बंदरात आज दुपारपर्यंत 600 बोटी दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

'ओखी'च्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये शाळांना सुट्टी

मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला ओखी वादळाचा इशारा

कोकण किनारपट्टीला ओखी वादळाचा फटका, समुद्राला उधाण

मालवणच्या समुद्रात पोलिसांची गस्तीनौका बुडाली