लातूर : तीनपैकी दोन महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. लातूर आणि चंद्रपुरात भाजपचं कमळ फुललं आहे. तर परभणीत काँग्रेसने सत्ता राखली आहे.

चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. 

लातूर




70 जागांच्या लातूर महानगरपालिकेत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. देशमुखांच्या गढीत काँग्रेसचं पानिपत करुन भाजपने सत्तेच्या चाव्या मिळवल्या आहे. 36 जागांसह भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला 33 जागांवर समाधान मानावं लागलं.

लातूर महानगरपालिकेच्या स्थापनेपासून 1995 चा अपवाद वगळता सातत्याने काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे काँग्रेसच्या पराभवामुळे अमित देशमुख यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तर भाजपच्या विजयाने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचं नेतृत्त्व सिद्ध केलं आहे. याचं बक्षीस म्हणून संभाजी पाटलांची मंत्रिमंडळात बढती होण्याची जोरदार चर्चा आहे.

लातूर महापालिका (70 जागा)

भाजपा - 36

काँग्रेस - 33

राष्ट्रवादी - 1

एकूण जागा- 70

चंद्रपूर




तर दुसरीकडे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातही सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपने पराभवाची धूळ चारली. 66 पैकी 36 जागांसह चंद्रपुरात भाजपचं कमळ फुललं आहे. तर काँग्रेसला चंद्रपुरात 12 जागाच मिळवता आल्या.

चंद्रपूर महापालिका (66 जागा)

भाजप- 36

काँग्रेस- 12

बसपा- 8

मनसे- 2

राष्ट्रवादी- 2

शिवसेना- 2

अपक्ष-3

प्रहार-1

एकूण जागा- 66

परभणी




काँग्रेससाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे परभणीची सत्ता कायम राखण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला यश आलं आहे. 65 जागांच्या परभणी महापालिकेत शिवसेनेचं आव्हान मोडून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ता काबीज केली आहे. काँग्रेसने 31 आणि राष्ट्रवादीने 18 जागा मिळवल्या. तर भाजप 8 धावांवर आटोपली.

परभणी महापालिका (65)

काँग्रेस - 31

राष्ट्रवादी - 18

शिवसेना - 6

भाजप - 8

इतर - 2

एकूण जागा - 65

संबंधित बातम्या

लातूर महापालिकेवर भाजपचा झेंडा


चंद्रपूर महापालिका निकाल 2017 : चंद्रपुरातही कमळ फुललं


परभणी महापालिका निकाल 2017 : काँग्रेस मोठा पक्ष


--------------

लातूर : चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतमोजणी होत आहे. तिन्ही महापालिकेतील 201 जागांसाठी रिंगणात उभे असलेल्या 1 हजार 285 उमेदवारांचं भवितव्याचा आज निकाल लागणार आहे.



  • चंद्रपूर अंतिम निकाल - भाजप 36, काँग्रेस 12, बसपा 8 राष्ट्रवादी 2, शिवसेना 2, मनसे 2, प्रहार 1, अपक्ष 3 ठिकाणी आघाडीवर

  • परभणी अंतिम निकाल : काँग्रेस 29, राष्ट्रवादी 20, भाजप 8, शिवसेना 6, अपक्ष 2

  • परभणी अंतिम निकाल : काँग्रेस 31, राष्ट्रवादी 18, भाजप 8, शिवसेना 6, अपक्ष 2

  • चंद्रपूर - भाजप 32, काँग्रेस 17, बसपा 3 राष्ट्रवादी 2, शिवसेना 2, मनसे 2, प्रहार 1, अपक्ष 1 ठिकाणी आघाडीवर

  • चंद्रपूर - भाजप 32, काँग्रेस 17, राष्ट्रवादी 2, शिवसेना 2, मनसे 2, प्रहार 1, अपक्ष 1 ठिकाणी आघाडीवर

  • चंद्रपूर - भाजप 31, काँग्रेस 15, राष्ट्रवादी 2, अपक्ष 1, शिवसेना 2, मनसे 2, प्रहार 1 ठिकाणी आघाडीवर

  • परभणी - काँग्रेस 31, भाजप 8, राष्ट्रवादी 7, शिवसेना 7, अपक्ष 1 ठिकाणी आघाडीवर

  • परभणी - प्रभाग 10 विजयी - (क) विजय जामकर (राष्ट्रवादी), (ब) बाळासाहेब बुलबुले (राष्ट्रवादी), (अ) वर्षा खिल्लारे (राष्ट्रवादी), (ड) अद्याप निकाल बाकी

  • लातूर - देशमुखांच्या लातूरमध्ये भाजपची सत्ता, भाजप 38, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 1 जागा

  • चंद्रपूर - भाजप 31, काँग्रेस 11, राष्ट्रवादी 2, अपक्ष 2, शिवसेना 1, मनसे 1 ठिकाणी आघाडीवर

  • लातूर - भाजपा - 40 (26 जागांवर विजयी तर 14 जागांवर आघाडी), काँग्रेस - 26 जागा

  • परभणी - काँग्रेस 23, भाजप 6, राष्ट्रवादी 8, शिवसेना 6, अपक्ष 1 ठिकाणी आघाडीवर

  • चंद्रपूर - भाजप 27, काँग्रेस 11, राष्ट्रवादी 2, अपक्ष 2, शिवसेना 1, मनसे ठिकाणी आघाडीवर

  • परभणी - काँग्रेस 22, भाजप 6, राष्ट्रवादी 8, शिवसेना 6 ठिकाणी आघाडीवर

  • चंद्रपूर - भाजप 27, काँग्रेस 11, राष्ट्रवादी 2, अपक्ष 2, शिवसेना 1 ठिकाणी आघाडीवर

  • परभणी - प्रभाग 15 मधून भाजपचे पाचही उमेदवार विजयी  रंजना सांगळे, अशोक डहाळे, सौ मंगला मुदगकर, नंदकुमार दरक, विद्या पाटील यांचा विजय

  • चंद्रपूर - भाजप 21, काँग्रेस 7, राष्ट्रवादी 2, अपक्ष 2 ठिकाणी आघाडीवर

  • चंद्रपूर - भाजप 17, काँग्रेस 7, राष्ट्रवादी 1, अपक्ष 2 ठिकाणी आघाडी

  • परभणी - काँग्रेस 20, भाजप 6, राष्ट्रवादी 9, शिवसेना 4 ठिकाणी आघाडीवर

  • चंद्रपूर - भाजप 13, काँग्रेस 7, राष्ट्रवादी 2, अपक्ष 2 ठिकाणी आघाडीवर

  • लातूर - प्रभाग क्र. 10मधून काँग्रेसच्या कांचन अंजनीकर विजयी

  • लातूर - भाजप 34, काँग्रेस 24, रिपाइंला 1 ठिकाणी आघाडीवर

  • परभणी - प्रभाग क्रमांक 3 मध्ये महेमुद खान (काँग्रेस), अनिता सोनकांबळे (काँग्रेस), शेख फरहत (काँग्रेस), अमरदीप रोडे (शिवसेना)

  • चंद्रपूर - भाजप 12, काँग्रेस 7, राष्ट्रवादी 1, अपक्ष 1 ठिकाणी आघाडीवर

  • परभणी - काँग्रेस 21, भाजप 1, राष्ट्रवादी 11, शिवसेना 3 ठिकाणी आघाडीवर

  • लातूर - भाजप 35, काँग्रेस 25, राष्ट्रवादी 1 ठिकाणी आघाडीवर

  • लातूर - भाजप 33, काँग्रेस 24, रिपाइंला 1 ठिकाणी आघाडीवर

  • परभणी - काँग्रेस 19, भाजप 1, राष्ट्रवादी 10, शिवसेना 2 ठिकाणी आघाडीवर

  • चंद्रपूर - सुभाष कासमगोट्टूवार (भाजप), अनिल फुलझेले (भाजप), अशोक नागपुरे (काँग्रेस) यांचा विजय

  • लातूर - भाजप 30, काँग्रेस 25, रिपाइंला 2 जागांवर आघाडी

  • चंद्रपूर - भाजप 8, काँग्रेस, 7, अपक्ष 1 ठिकाणी आघाडीवर

  • लातूर - काँग्रेसचे नेते असगर पटेल पिछाडीवर, भाजपाचे अजित पाटील आघाडीवर

  • चंद्रपूर - भाजप 4, काँग्रेस, 4, राष्ट्रवादी 1, अपक्ष 3 ठिकाणी आघाडीवर

  • लातूर - भाजप 31, काँग्रेस 22, राष्ट्रवादी 1, रिपाइं 1 ठिकाणी आघाडीवर

  • परभणी - काँग्रेस 14, भाजप 1, राष्ट्रवादी 8, शिवसेना 1 ठिकाणी आघाडीवर

  • लातूर - भाजप 28, काँग्रेस 23 ठिकाणी आघाडीवर

  • परभणी - प्रभाग 1 मधून काँग्रेसचे तीन आणि भाजपचा एक उमेदवार विजयी, काँग्रेसच्या गणेश देशमुख, राधिका गोमचाले, बबलू नागरे, तर भाजपच्या मोकिंड खिल्लारे यांचा विजय

  • लातूर - भाजप 28, काँग्रेस 22 ठिकाणी आघाडीवर

  • लातूर - काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे पिछाडीवर, भाजपचे हनुमान जागते आघाडीवर

  • परभणी - काँग्रेस 13, भाजप 1, राष्ट्रवादी 7, शिवसेना 1 ठिकाणी आघाडीवर

  • लातूर - भाजप 26, काँग्रेस 21 ठिकाणी आघाडीवर

  • चंद्रपूर - भाजप 4, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 1, अपक्ष 3 ठिकाणी आघाडी

  • परभणी - प्रभाग 8 मधून काँग्रेसचे चार उमेदवार विजयी, कलीम अन्सारी, सय्यद सामी लाला, सबिहाबेगम हसन बाजवाह, मुनसिफ खान विखार यांचा विजय

  • चंद्रपूर - भाजप 4, काँग्रेस 3, अपक्ष 1 ठिकाणी आघाडी, प्रभाग क्र.1 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी

  • लातूर - भाजप 23, काँग्रेस 22 ठिकाणी आघाडीवर

  • लातूर - भाजपची मुसंडी, 22 जागांवर आघाडी, काँग्रेस 20 ठिकाणी आघाडीवर

  • परभणी - काँग्रेस 8, भाजप 1, राष्ट्रवादी 3, शिवसेना 1 ठिकाणी आघाडीवर

  • लातूर - काँग्रेसच्या माजी महापौर स्मिता खानापुरे पिछाडीवर, भाजपच्या शोभा पाटील आघाडीवर

  • परभणी - काँग्रेस 6, भाजप 2, राष्ट्रवादी 2, शिवसेना 1 ठिकाणी आघाडीवर

  • लातूर - भाजप 16, काँग्रेस 22 ठिकाणी आघाडीवर

  • लातूर - भाजप 15, काँग्रेस 20 ठिकाणी आघाडीवर

  • चंद्रपूर - भाजपला 4 जागांवर आघाडी, प्रभाग १ मधून भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर

  • परभणी - काँग्रेस 6, भाजप 2 ठिकाणी आघाडीवर

  • लातूर - भाजप 14, काँग्रेस 19 ठिकाणी आघाडीवर

  • लातूर - भाजप 14, काँग्रेस 16 ठिकाणी आघाडीवर

  • लातूरमध्ये पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीनंतर काँग्रेस 13 तर भाजप 12 ठिकाणी आघाडीवर

  • लातूरमध्ये पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीनंतर काँग्रेस 10 तर भाजप 8 ठिकाणी आघाडीवर

  • परभणीतून पहिला कल हाती, काँग्रेसचे 3 आणि भाजपचे 2 उमेदवार आघाडीवर

  • लातूर, परभणी, चंद्रपूरमध्ये मतमोजणीला सुरुवात


--------------------

लातूर : चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.

तिन्ही महापालिकेतील 201 जागांसाठी रिंगणात उभे असलेल्या 1 हजार 285 उमेदवारांचं भवितव्याचा आज निकाल लागणार आहे.

उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन या तिन्ही ठिकाणी सायंकाळी 5.30 ऐवजी 6.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली होती. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी 57 टक्के, परभणी महानगरपालिकेसाठी 70 टक्के, तर लातूर महानगरपालिकेसाठी 60 टक्के मतदान झालं.

या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लातूर महापालिकेचा गड काँग्रेस राखणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तर चंद्रपूर महापालिकेची सत्ता मिळ्वण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवरांची प्रतिष्ठा पणाला लागली.

लातूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 70
 
राष्ट्रवादी काँग्रेस - 13
काँग्रेस - 49
शिवसेना - 06
रिपाइं - 02

परभणी महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 65

राष्ट्रवादी काँग्रेस - 30
काँग्रेस - 23
शिवसेना - 8
भाजप - 2
अपक्ष - 2

चंद्रपूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 66

काँग्रेस - 26
भाजप - 18
शिवसेना - 5
राष्ट्रवादी - 4
मनसे - 1
बीएसपी - 1
अपक्ष - 10
भारिप बहुजन महासंघ - 1

तिन्ही महापालिकेत एकूण 125 उमेदवार कोट्यधीश असल्याचं समोर आलं आहे. तर 64 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. विशेष म्हणजे, 1 हजार 284 उमेदवारांपैकी एकूण 806 उमेदवार अल्पशिक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी भाजपाने 44, काँग्रेसने 31, राष्ट्रवादी काँग्रेसने 19, शिवसेनेने 15 कोट्यधीश आणि लखपतींना उमेदवारी दिली आहे. या सर्व उमेदवारांची मिळून सरासरी संपत्ती काढली, तर प्रत्येकजण 50 लाखांच्या संपत्तीचा मालक आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांमध्ये 64 उमेदवारांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, विनयभंग, दरोडा आणि जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत.  यातील सर्वाधिक गुन्हे हे लातूरच्या वार्ड क्रमांक 7 मधील रिपाइंचे उमेदवार चंद्रकांत चिट्टेवर यांच्याविरोधात आहेत. चिट्टेवर यांच्याविरोधात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगारांना तिकीट वाटपात या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. कारण, काँग्रेसचे 24, भाजपचे 18, शिवसेनेचे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 उमेदवार गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत.

फेब्रुवारी महिन्यात मुंबई, पुण्यासह दहा महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं होतं. त्यामुळे चंद्रपूर, परभणी आणि लातूर महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.