- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
LIVE UPDATES | 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेची चौकशी संदर्भात करण्याबाबत मुनगंटीवार यांचं विद्यमान वन मंत्र्यांना पत्र
LIVE UPDATES | 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेची चौकशी संदर्भात करण्याबाबत मुनगंटीवार यांचं विद्यमान वन मंत्र्यांना पत्र
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
20 Feb 2020 10:43 PM
परभणी : पिकअप आणि मॅक्स जीप यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाला. यात मॅक्स जीप मधील एक ठार, तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. अपघातानंतर मॅक्स जीप पलट्या होऊन तब्बल 300 मीटर पुढे गेली. जीपचा अक्षरशः चुराडा झालाय. पाथरी परभणी राष्ट्रीय महामार्ग 61 वर रात्रीच्या सुमारास प्रवाशी वाहतूक करणारी मॅक्स जीप एम एच 23 ई 3169 पाथरीकडून मानवतकडे जात होती. तर माल वाहतूक करणारा पिकअप एम एच 21 एक्स 2721 या दोन वाहनात समोरासमोर भीषण अपघात झाला.
आज दिशा कायद्याबाबत माहिती घेतली, पाच अधिकाऱ्यांची टीम बनवली आहे. ही टीम पुढच्या सात दिवसात अहवाल देईल. त्यानंतर कॅबिनेट पुढे प्रस्ताव येईल. त्यानंतर याबाबत अधिवेशनात चर्चा करू, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातही दिशा कायद्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे.
मुंबईच्या विलेपार्ले परिसरातून तब्बल 80 कोटी रुपये किंमतीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. मॅऊ मॅऊ नावानं ओळखलं जाणारं अर्थात एमडी ड्रग्जचा 200 किलोचा साठी एका फॅक्टरीमधून जप्त करण्यात आलाय. तपासादरम्यान या ड्रग्जचं पुणे कनेक्शन देखील समोर आलंय. पुण्यातल्या एका कंपनीत हे एमडी ड्रग्ज तयार करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
गोंदिया : गोंदिया शहरात 14 फेब्रुवारीला झालेल्या हत्येसंदर्भात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली. मृत सुरेश यादव याची गोळ्या झाळून हत्या करण्यात आली होती.
गोंदिया : भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मृताच्या भावाने आरोपीच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली. 7 आरोपींना पोलिसांनी सात दिवसात अटक केली.
एकीकडे महाविकास आघाडी सरकार फडणवीस सरकारच्या निर्णयाला स्थगिती देत असताना गेल्या सरकारचा एक निर्णय मात्र महाविकास आघाडी राबवण्याची शक्यता आहे. राज्यातल्या सेझच्या प्रकल्पांना दिलेल्या पण न वापरलेल्या जमिनी परत घेऊन त्या जमिनीवर परवडणारी घर बांधण्याचा फडणवीस सरकारचा 2015 चा निर्णय होता. राज्यातील अशी 25 हजार एकर जमीन सेझ प्रकल्पासाठी न वापरल्यामुळे सरकार परत घेऊ शकते, आणि याचा वापर गृहनिर्माणासाठी करण्याचा गृहनिर्माण खात्याचा विचार आहे. सीआयआयच्या एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी मागच्या सरकारचे अभिनंदन करत हे धोरण देवेंद्र फडणवीस यांनीच अमलबजावणी करायला हवी होती, त्यांनी का केलं माहीत नाही. पण याची अमलबजावणी झाली पाहिजे असं वक्तव्य केलं. हे धोरण राबविल्यास मोठ्या उद्योगपतींना धक्का बसू शकतो.
33 कोटी वृक्षलागवड मोहिमेची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत करण्याबाबत माजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं विद्यामान वन मंत्री संजय राठोड यांना पत्र
मलबार हिलवरील 105 वर्ष जुना बंगला पाडून 18 मंत्र्यांसाठी 18 मजली टोलेजंग इमारत उभारणार, 120 कोटी रुपये खर्च येणार
पुणे : जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे गावाजवळ असलेल्या केमिकल फॅक्टरीत ड्रग्ज बनवलं जात असल्याच समजल्यावर महाराष्ट्र एटीएसने केलेल्या कारवाईत दोघांना अटक करण्यात आलीय. या दोघांकडून जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रॉनची किंमत जवळपास दहा कोटी रुपये आहे. पोलिसांनी या प्रकरणी महेंद्र परशुराम पाटील आणि संतोष बाळासाहेब आडके या दोघांना अटक केलीय. दिवे गावाजवळ असलेल्या श्री अल्फा केमिकल्स या कंपनीत संतोष आडके हे मेफेड्रॉन तयार करायचा आणि मुंबईत त्याची विक्री केली जायची. पोलिसांनी आधी मुंबईतील विले पारले मधे मेफेड्रॉन जप्त केलं. चौकशीत हे मेफेड्रॉन दिवे गावाजवळ तयार केलं जातं असल्याच समजल्यावर पोलिसांनी श्री अल्फा केमिकल या कंपनीवर छापा मारला.
गोवा : प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या गोवा शाखेच्या वतीने महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला पणजी येथील बांदोडकर मैदानावर 108 शिव लिंगे वापरून एक मोठ्या आकाराच्या शिवलिंगाचा हलता देखावा बनवला आहे. यात शंकर पार्वतीची मूर्ती असून त्यांच्या समोरील शिवलिंगातून दिव्य ज्योती बाहेर येत असल्याचा देखावा साकारण्यात आला आहे. आज सायंकाळी भाजपचे थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर आणि पणजीचे महापौर उदय मडकईकर यांच्या हस्ते याचे उद्धाटन करण्यात आले. आजपासून 26 फेब्रुवारी पर्यंत हा देखावा लोकांना पाहण्यासाठी खुला असणार आहे.
पुणे : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात अंधश्रद्धेचं दर्शन घडलं. गॅस दरवाढी विरोधात हे आंदोलन असल्याने राष्ट्रवादीने चूल पेटवली. उपरोधात्मक आंदोलन करताना गॅस केवळ हळद-कुंकू लावण्यापुरते उरलेत असं दाखवण्यात आलं. इथपर्यंत ठीक होतं. मात्र, त्याचवेळी चुलीला हळद-कुंकू चुलीवर आणि अगरबत्ती लावण्यात आली. नंतर त्याच चुलीवर भाकरी करून गॅस दर वाढीचा निषेध करण्यात आला. पण यातून राष्ट्रवादीने अंधश्रद्धेचं दर्शन घडवलं.
मुंबईत जीएसटी भवनच्या आगीत तिरंगा वाचवणारे कुणाल जाधव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कुणाल जाधव हे जीएसटी भवनमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. आग लागल्यानंतर बचावकार्य सुरु असताना इमारतीवरील तिरंगा तसाच असल्याचं जाधव यांच्या निदर्शनास आलं. त्यानतंर आगीतून राष्ट्रध्वज वाचवण्यासाठी ते जीवाची बाजी लावून पेटत्या इमारतीचे नऊ मजले पळत-पळत चढून गेले आणि तिरंगा सुखरूप खाली आणला.
राष्ट्रवादी काँग्रेस आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. मुंबईत 1 मार्च रोजी एक दिवसीय शिबीर होणार आहे. या शिबिरात विविध मंत्री दिवसभर मार्गदर्शन करणार आहेत. तर शिबिराचा समारोप शरद पवार यांच्या भाषणाने होणार आहे. आतापर्यंत मुंबई राष्ट्रवादीला काँग्रेसला जास्तीत जास्त 14 आणि कमीत कमी 9 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे जास्त जागा मिळवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काम करणार आहे.
पुणे माणगाव रस्त्यावर ताम्हिणी घाटात आज पहाटेच्या सुमारास कारला झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. निखील घुले, चंद्रकांत निकम आणि विक्रम सिंग अशी मृतांची नावे असून ते पुण्यातील रहिवासी आहेत. तर विजय पाटील आणि सुनील तेलंग गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालय आणि पुणे इथे उपचार सुरु आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आज नागपूरच्या सीजेएम कोर्टासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये आपल्या विरोधातील दोन गुन्हे प्रतिज्ञातापत्रात जाहिर न केल्याच्या याचिकेसंदर्भातील सुनावणीसाठी आज देवेंद्र फडणवीस कोर्टात हजर राहणार आहेत. या याचिका जिल्हा न्यायालय आणि उच्चन्यायालयानं रद्द केल्या होत्या. मात्र सुप्रीम कोर्टानं या संदर्भातील सुनावणी पुन्हा एकदा जिल्हा न्यायालयात चालवण्याचे आदेश दिल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस कोर्टात हजर राहतील.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आज नागपूरच्या सीजेएम कोर्टासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये आपल्या विरोधातील दोन गुन्हे प्रतिज्ञातापत्रात जाहिर न केल्याच्या याचिकेसंदर्भातील सुनावणीसाठी आज देवेंद्र फडणवीस कोर्टात हजर राहणार आहेत. या याचिका जिल्हा न्यायालय आणि उच्चन्यायालयानं रद्द केल्या होत्या. मात्र सुप्रीम कोर्टानं या संदर्भातील सुनावणी पुन्हा एकदा जिल्हा न्यायालयात चालवण्याचे आदेश दिल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस कोर्टात हजर राहतील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सावध पवित्रा, विरोधी पक्षाने आक्षेप घेण्याआधी राज्यमंत्री अरविंद सावंत, रवींद्र वायकर यांचा राजीनामा
मंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या खर्चाबाबत एबीपी माझाच्या बातमीची अजित पवार यांनी दखल घेतली आहे. बंगल्यांवर होणारा खर्च मर्यादित ठेवा, असा आदेश अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. तसंच वास्तुविशारदांनी सुचवलेल्या महागड्या वस्तूंचा खर्च टाळावा, अशी सूचनाही अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. याशिवाय मंजूर निधीपेक्षा जास्त निधी मिळणार नाही, असं अजित पवार यांनी खडसावलं.
लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने तसेच भारतीय रुपयात होत असलेल्या घसरणीमुळे सोन्याच्या भावात आठ दिवसांत तब्बल 1250रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बुधवारी सोने 41 हजार 750 रुपये प्रती तोळयावर पोहचले. चांदीचा भावही सहा दिवसांत दीड हजार रुपयांनी वाढून ती 47 हजार 500 रुपये प्रती किलोवर पोहचली आहे.
पंधरवड्यापूर्वी हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला जिवंत जाळून ठार मारणारा मारेकरी विकेश उर्फ विक्की नगराळे (वय 27 रा. दारोडा) याने बुधवारी नागपूर कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. कारागृह प्रशासनाने मात्र यास नकार दिला आहे. विकेश नागपूर मध्यवर्ती कारागृहातील विशेष बराकीत आहे
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. रामजन्मभूमी न्यासाप्रमाणेच मशिदीसाठी वेगळा ट्रस्ट का नाही?, शरद पवारांचां सरकारला सवाल, हा देश सर्वांचा असल्याचाही भाजपला टोला
2. पीकविमा काढायचा की नाही हे आता शेतकरी ठरवणार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मोदी सरकारचा निर्णय, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
3. राज्य सरकार तब्बल पावणे दहा लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटणार,चष्म्याचा नंबर बदलल्यास सरकारच खर्च करणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
4. अखेर पुणे पोलिसांकडून एल्गारची कागदपत्रं एनआयएला सुपूर्द, आरोपपत्रांचे दस्तावेज, हार्डडिस्क, पुराव्यांवर एनआयए पुढील तपास करणार
5. फ्लोरा फाऊंटन परिसरातील तीन झाडांना अॅसिडचं इंजेक्शन, झारा कंपनीच्या शोरूमसाठी वृक्ष तोडल्याचा आरोप, पर्यावरणप्रेमी संघटनेची 'झारा'विरोधात तक्रार
6. अयोध्येतल्या मंदिरात रामलल्लासाठी बुलेटप्रूफ कॉटेज, राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या बैठकीत निर्णय, आराखड्याची एक्स्क्लुझिव्ह झलक माझावर