मुंबई : सुमारे 1 लाख 90 हजार लोकांचा प्रतिसाद मिळविणाऱ्या सर्वेक्षणानुसार 51 टक्के भारतीयांनी लाच घेतल्याचे मान्य केले आहे. वर्षभरात 51 टक्के लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. मालमत्ता नोंदणी केंद्र, पोलिस खाते आणि नगरपालिका या सरकारी ठिकाणी सर्वात जास्त लाच मागितल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. या सर्वेक्षणात 1 लाख 9० हजार लोकांनी सहभाग घेतला होता. सर्वात जास्त भ्रष्टाचार करणाऱ्या आठ राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश नाही.
भ्रष्टाचारी देशाच्या क्रमवारीत भारताची घसरण झाली आहे. पासपोर्ट आणि रेल्वे तिकीटासारख्या सुविधा केंद्र यासारख्या सरकारी सुविधा संगणीकृत केल्याने भारतात भ्रष्टचारात घट झाल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार जास्त होत असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. देशातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी राज्यांमध्ये राजस्थान, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, तेलंगणा, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडूचा समावेश आहे.
राज्यातील सर्वात भ्रष्ट राज्ये
1.राजस्थान- सर्व्हेतील 78 टक्के नागरिकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार हे राज्य सर्वात भ्रष्ट म्हणून पात्र ठरले आहे. त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागली. सुमारे 22 टक्के लोकांना अनेक वेळा लाच द्यावी लागली. त्यातील 56 टक्के लोकांनी फक्त एकदाच किंवा दोनदा लाच दिली. तर 22 टक्के नागरिक आहेत ज्यांनी असे सांगितले की त्यांना आपले काम पूर्ण करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत
2. बिहार- बिहार राज्यातील 75 टक्के नागरिकांनी लाच दिल्याचे सांगितले. त्यातील 50 टक्के लोकांनी अनेक वेळा पैसे दिले. तर २5 टक्के लोकांनी फक्त एकदाच किंवा दोनदा लाच दिली नाही, तर 25 टक्के लोकांनी लाच घेतल्याशिवाय आपले काम पूर्ण केल्याचे सांगितले.
3. झारखंड- झारखंडमधील एकूण 74 टक्के नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांचे कामकाज करण्यासाठीचे अधिकारी हे लाच अधिकारी आहेत. विशेष म्हणजे सर्व 74 टक्के लोकांना अनेक वेळा लाच द्यावी लागली तर 13 टक्के लोकांनी पैसे न देता आपले काम पूर्ण केल्याचे सांगितले.
4. उत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशमधील सर्वेक्षणात सहभागींपैकी 74 टक्के लोकांनी आपले काम पूर्ण करण्यासाठी लाच देण्याचे कबूल केले. त्यापैकी 57 टक्के लोकांनी अनेक वेळा लाच दिली. सुमारे 17 टक्के लोकांना एकदा किंवा दोनदा लाच द्यावी लागली. तर फक्त 3 टक्के लोकांनी लाच न देता काम केल्याचे सांगितले.
5. तेलंगणा - सुमारे 67 टक्के तेलंगणातील नागरिक म्हणाले की असंख्य प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी लाच दिली. त्यापैकी 56 टक्के लोकांनी अनेक वेळा लाच देण्याचे कबूल केले. तर 11 टक्के लोकांनी एकदा किंवा दोनदा लाच दिली. एकूण 11 टक्के लोकांनी अनधिकृत पैसे न देता काम पूर्ण केल्याचे सांगितले आहे.
6. पंजाब - कर्नाटकप्रमाणेच पंजाबमधील 63 टक्के नागरिकांनी त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी लाच देणे पसंत केले. त्यापैकी 27 टक्के लोकांनी अनेकदा लाच दिली तर 36 टक्के लोकांनी एकदा किंवा दोनदा लाच दिली. जवळजवळ 27 टक्के लोकांनी टेबलवर पैसे न देता काम पूर्ण केले.
7. कर्नाटक- कर्नाटकातील 63 टक्के रहिवाशांनी अधिकृत काम करण्यासाठी लाच दिल्याची कबुली दिली आहे. यापैकी 35 टक्के लोकांना अनेकदा लाच द्यावी लागली तर 28 टक्के लोकांनी फक्त एकदाच किंवा दोनदा लाच दिली. सुमारे 9 टक्के लोकांनी लाच न देता काम पूर्ण केल्याचे सांगितले.
8. तमिळनाडू - तमिळनाडूच्या सुमारे 62 टक्के नागरिकांनी सरकारी काम पूर्ण करण्यासााठी लाच दिल्याचे कबूल केले आहे. तर 27 टक्के नागरिकांनी काम पूर्ण करण्यासाठी एकदा किंवा दोनदा लाच दिल्याचे सांगितले आहे. केवळ 8 टक्के नागिरकांनी लोकांनी एकदाही लाच न देता काम पूर्ण केल्याचे सांगितले आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशातील सर्वात भ्रष्ट राज्यांची यादी जाहीर, कोणते राज्य कितव्या स्थानावर?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Nov 2019 02:16 PM (IST)
रकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार जास्त होत असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. देशातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी राज्यांमध्ये राजस्थान, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, तेलंगणा, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडूचा समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -