कोल्हापूर : कोल्हापुरात 90 वर्षाच्या वृद्धेवरील बलात्कारप्रकरणी एका नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे. 2015 मधील या बलात्कारप्रकरणी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं आज निकाल दिला.
नागणवाडीत 4 मार्च 2015 रोजी 90 वर्षाची वृद्ध महिला घरात एकटीच होती. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत आरोपी विष्णू नलवडेनं घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. भुदरगड पोलिसांनी घटनेचा तपास करुन आरोपीविरोधात कोर्टात दोषारोप पत्र सादर केलं. यानंतर 9 साक्षीदार तपासण्यात आले.
दरम्यान, सरकारी वकीलांनी आरोपीला फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर कोर्टाने सरकारी विकालांचा युक्तीवाद आणि पुराव्याना ग्राह्य धरत आरोपी विष्णू कृष्णा नलवडे याला दोषी ठरवत तसेच मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली.