Laxman Hake : देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगाव की, पोहरादेवीची परिस्थिती काय आहे. पंतप्रधान मोदी यांना दाखवला जातो तो महाराष्ट्र नाही, भटक्या आणि विमुक्तांचा हा महाराष्ट्र आहे. निवडणुका तोंडावर पाहता पोलारायझेशन करण्यासाठी ते असं वक्तव्य करतात. पवार साहेबांना सगळं कळत आहे, म्हणून ते काही बोलतात. जे मनोज जरांगेला बोलता येत नाही, ते पवार साहेब (Sharad Pawar) बोलतात. मनोज जरांगे (Manoj Jarange Patile) म्हणजे शरद पवार, शरद पवार म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. पुढे तिघं एकत्र आले आणि सीएम एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) झाले तर काय खरं नाही, असे म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake)यांनी परत एकदा निशाणा साधला आहे.  


....तर ओबीसी देखील त्यांना जशास तसे उत्तर देतील


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे दसरा मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे. यावेर देखील ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake)यांनी भाष्य करत टीका केली आहे. महाराष्ट्रात मेळावे खूप आहेत. लाखोंचे मेळावे बघायला महाराष्ट्रात आमच्याकडे तुम्ही या. अशाप्रकारे मिळावे घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र ओबीसी देखील जशास तसे उत्तर त्यांना देतील, असे आव्हान देत  हाके यांनी टीका केली आहे. पुढे बोलताना लक्ष्मण हाके यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भेटी संदर्भातही भाष्य केलं.  ओबीसींना त्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे आभार  आम्ही मानले. भविष्यात आम्ही एकत्र येऊन त्यांना साथ देखील देऊ शकतो, असेही लक्ष्मण हाके म्हणाले.  


ओबीसी जनता ओबीसींनाच मतदान करेल


ज्या ज्या आमदारांनी मनोज जरांगेला सपोर्ट केला, पैसा पुरवला, लेखी पाठिंबा दिला त्यांना आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत पाडणार असल्याचेही  लक्ष्मण हाके म्हणाले. आमच्याकडे सर्वांची यादी आहे. ओबीसी जनता ओबीसींनाच मतदान करेल. या बांडगुळ्यांना कोणीही मदत करणार नाही. सर्वांना ओबीसींची मते हवीत. मात्र त्यांच्या आरक्षणावर कोणी बोलत नाही. मग का आम्ही त्यांना मतदान देऊ? लक्ष्मण हाके कधी उद्धव ठाकरे यांचे समर्थक, तर कधी देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असल्याचे म्हणतात. मात्र ते काही आतंकवादी आहेत का? ज्यांनी ओबीसींसाठी भूमिका घेतली त्यांना पुन्हा आम्ही मुख्यमंत्री करू. देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबांपर्यंत तुम्ही जाता, हि कुठली संस्कृती ? दारूचा आरोप केला, चाचण्या झाल्या, त्यात काही आलं नाही. का असे चाळे करता. कितीही आणि काहीही आरोप करा ओबीसीचं आंदोलन कुठे थांबणार नाही. असेही लक्ष्मण हाके म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Laxman Hake : संभाजी भोसलेंनी माझ्या अंगावर माणसं घातली, पण जीव गेला तरी...; पुण्यातील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंनी ठणकावून सांगितलं