Amravati News अमरावती : अमरावती (Amravati News) शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गाझियाबाद येथे स्वामी यती नरसिंहानंद यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद आता अमरावतीतही उमटताना बघायला मिळाले आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या स्वामी यती नरसिंहानंद त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी काल शुक्रवारी अमरावतीच्या नागपूरी गेट पोलीस स्टेशनवर मोठ्या संख्येने जमाव आलेला होता. दरम्यान काही वेळात हा जमाव हिंसक झाला आणि अचानक नागपुरी गेट पोलीस ठाण्यात हजर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या या दगडफेकीत मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वाहनाचे आणि पोलीस स्टेशनचे देखील नुकसान झालेले आहे.
दगडफेकीत 29 पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, जवळ जवळ दोन ते अडीच हजार लोकांचा जमाव याठिकाणी जमला होता. दरम्यान, हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी रात्री अखेर हवेत गोळीबार आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून लाठीचार्ज करावा लागला. तर रात्री एक वाजतानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. जमावाकडून करण्यात आलेला दगडफेकीमध्ये 29 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेले आहेत. सध्या या परिसरातसध्या जमाबंदीचे आदेश देण्यात आले असून शांतता राखण्याच्या आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले.
विजेचा धक्का लागून वेगवेगळ्या घटनेत चौघांचा मृत्यू
वन्य प्राण्यापासून पिकाच्या बचावासाठी शेताच्या कुंपणाला सोडण्यात आलेल्या वीज प्रवाहाचा धक्का लागल्याने यवतमाळच्या रातचंदना येथील शेतकरी दाम्पत्यच्या, तर बुलढाणाच्या डोलारखेड येथे दुर्गा उसत्व मंडळाच्या विधुत तारेला स्पर्श झाल्याने दोन युवकांचा, असा वेगवेगळ्या घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
यवतमाळ येथे शेतात जागलीला गेलेल्या शेतातील कपाशीच्या पिकाला वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी कुंपणाच्या तारेत वीज प्रवाह सोडला होता, मात्र याचा झटका लागून पती-पत्नी यांचा मृत्यू झालाय. आनंदा शंकर कोरंगे (40) अनिता आनंदा कोरंगे (35) पती अशी मृतांची नावे आहे. कोरंगे दाम्पत्यामागे 11 वीत शिकणारा मुलगा आणि आठवीत असणारी मुलगी हे दोघे आहेत. ही दोन्ही मुले पोरकी झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
तर बुलढाणा जिल्ह्यातील डोलारखेड येथे एका सार्वजनिक दुर्गाउत्सव मंडळाची विधुत रोषणाई करत असताना अचानक विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शुभम गजानन देठे(21) व गोवर्धन संतोष देठे (25) या दोघांचाही जागीच मृत्यू झालाय. दोघेही मंडळाचे सक्रिय सदस्य असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे देठे परिवारासह संपूर्ण मंडळावर शोककळा पसरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या