Latur: लातूरच्या जिल्हापरिषदेच्या शाळेत दोन वर्षांपासून गणित आणि विज्ञानाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकल्याची घटना समोर आलीये. विद्यार्थी शाळेत आज फिरकलेच नाहीत. त्यामुळं चार शिक्षकांनाच शाळेत झेंडावंदन करावं लागलंय. एरवी जिल्हा परिषद शाळांऐवजी खासगी शाळांची निवड केली जाते म्हणून ओरड सुरु असताना जिल्हा परिषदेच्या शाळेचा गलथान कारभार समोर आलाय. 


लातुर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील खलंग्री इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आज ध्वजारोहणाला विद्यार्थ्यांनीच पाठ फिरवली आहे. शाळेतील चार शिक्षकांनी  मिळून ध्वजारोहण केले आहे. मागच्या दोन वर्षापासून गणित आणि विज्ञान विषयासाठी या शाळेत शिक्षकच नाहीत.त्यामुळं या दोन्ही विषय शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून दिल्याशिवाय मुलांना शाळेत पाठवणार नाही, अशी भूमिका पालकांनी आणि गावकऱ्यांनी घेतली आहे. यामुळे मागील काही दिवसापासून विद्यार्थी शाळेकडे फिरकलेच नाहीत. प्रत्येक विषयाला शिक्षक नसल्याने विद्यार्थी घडणार कसा असा प्रश्न पालकांनी उपस्थित केलाय. 


प्रशासनाकडून कोणतंही उत्तर नाही, शेवटी..


ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचावी म्हणून ठिकठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू आहेत. मात्र या शाळेत शिक्षकांचा आणि सोयी सुविधांचा कायमच अभाव असतो. दोन वर्षापासून दोन विषयाची शिक्षक या शाळेत देण्यातच आली नाही. शेवटी कंटाळून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवनेच बंद केले आहे. याच कारणामुळे आज स्वातंत्र्यदिनी चार शिक्षकांनी ध्वजारोहण केलं आहे. विद्यार्थी शाळेकडे फिरकलेच नाहीत. गावकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाला याबाबत अर्ज विनंती केल्या होत्या. मात्र याबाबत कोणताही निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला नाही. शेवटी गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवनच बंद केला आहे.


मागच्या 12 तारखेपासून विद्यार्थ्यांचा बहिष्कार...


जिल्हा परिषदेच्या शाळेत गणित आणि विज्ञानाचा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली आहे. मागच्या चार दिवसापासून विद्यार्थी शाळेत फिरकलेच नसल्याचं समोर येतंय. दरम्यान, महाराष्ट्रातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्नही सूटलेला नसल्याने यंदा पहिल्यांदाच गणवेशाविना झेंडावंदन करावं लागल्याचं चित्र असताना आता लातूरच्या जिल्हा परिषेच्या शाळांमध्ये शिक्षक नसल्यानं विद्यार्थी शाळेत फिरकलेच नसल्याचं दिसून आलं.


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI