Latur NEET Paper leak: देशभरात नीट परीक्षेबाबत गदारोळ सुरू असताना नीट गैरवहाराप्रकरणी (NEET Paper Leak Case) सीबीआय कोठडीत असलेला लातूर नीट प्रकरणाचा म्हाेरक्या आरोपी एन गंगाधर अप्पा यास 4 दिवसांची म्हणजेच १९ जुलैपर्यंतची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांना आठवडाभरापूर्वीच न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. 


नीट गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी एन गंगाधर अप्पा यांची सीबीआय कोठडी संपली होती. आज याबाबत सीबीआय पथकाने कोर्टात हजर केले असता त्यास 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली आहे. 


देशभर गाजत असलेला नीट परीक्षेतील घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रात निघाले असून नीट अभ्यासक्रमाचे मराठवाड्यातील केंद्र लातूर येथे चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील संजय जाधव आणि जलील पठाण यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं होतं. तर आरोपी इराण्णा कोनगुलवार आरोपी फरार आहे.


इरण्णावर कोनगुलवारवर निलंबनाची कारवाई


नीट पेपरफुटी प्रकरणी देशभर गदारोळ माजला असून या गैरव्यवहाराचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्येही सापडले आहेत. नीटमध्ये गुण वाढवून देण्यासाठी दिल्लीतील आरोपी एन गंगाधर अप्पा याच्याशी संपर्कात असाणारा उमरगा आयटीआरमधील नोकरी करणाऱ्या इरण्णा कोनगुलवार या आरोपीवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.  या प्रकरणात तो मध्यस्थाची भूमिका वठवत होता अशी माहिती देण्यात आली होती.


धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआर येथे निदेशक पदावर कोनगुलवार कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. इरण्णा याच्यावर लातूरमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पेपरफूटी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. कोनगुलवारच्या मागावर पोलीस असून तो अद्याप फरार असल्याचे सांगण्यात आले.


सर्वोच्च न्यायालयात नीट पेपर फुटल्याची केंद्राची कबुली


नीटचा पेपर लीक झाला असल्याची कबुली पहिल्यांदाच केंद्र सरकारने दिली असून याप्रकरणी गुन्हा नोंद करून आरोपींनाही अटक केल्याचं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. पेपरफुटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना फायदा झाला त्यांची ओळख पटली असल्याचंही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.


पेपर फुटल्याचे सरकारने मान्य केले


विद्यार्थ्यांच्या वकिलांनी सांगितले की, व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनलवर पेपर लीक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. फुटलेला पेपर एका शाळेत वाय-फाय प्रिंटरद्वारे छापण्यात आला होता. बिहार पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात अशा वेगवेगळ्या गटांची माहिती मिळाली आहे.


लातूर नीट पेपर फुटी प्रकरणातील म्हाेरक्या एन गंगाधर अप्पा यांची सीबीआय कस्टडीत आज संपली होती. त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.आज न्यायालयाने त्याला 19 तारखेपर्यंत न्यायालय कोठडी देण्यात आली आहे.  


हेही वाचा:


Dharashiv News: नीट घोटाळ्यातील आरोपी इरण्णा कोनगुलवारचे प्रशासनाने केले निलंबन