अहमदनगर: आपल्या कारनाम्यांमुळे चर्चेत आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातून दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते. मात्र आता पूजा खेडकरच्या (IAS Pooja Khedkar) दिव्यांग प्रमाणपत्राबाबत कागदपत्रे सापडली असल्याची माहिती समोर आली आहे. आज जिल्हा शल्यचिकित्सक संबंधित कागदपत्रे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सादर करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आज (सोमवारी) सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची बैठक पार पडणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी फोनवरून दिली आहे.


पूजा खेडकरला अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळालं दिव्यांग प्रमाणपत्र


वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती समोर आली होती. जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. पूजा खेडकर संबधित सर्व कागदपत्रे आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सादर केली जाणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी दिली आहे. 


पूजा खेडकरला डोळे आणि मानसिक आजाराचे एकत्रित प्रमाणपत्र 2021 मध्ये दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तत्कालीन वैद्यकीय मंडळांना हे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती देण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळल्या असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले आहेत.


पूजा खेडकरचे (IAS Pooja Khedkar) वडील दिलीप खेडकर हे भालगाव (ता. पाथर्डी) येथील रहिवासी आहेत. परंतु, गेल्या काही वर्षापासून ते पुण्यात वास्तव्यास आहेत.तर पूजा खेडकर ही दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झालेली आहे. प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून तिची पुण्यात नियुक्ती करण्यात आलेली होती. खासगी वाहनावर लाल दिवा लावणं, भारत सरकार असा बोर्ड लावणं, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात हस्तांतरीत करणे, आदी नियमबाह्य वर्तन तिने केले होते त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली होती, त्यानंतर तिची बदली करण्यात आली होती. तर तिचे प्रमाणपत्र खोटं असल्याचा दावा करण्यात आला होता, त्यानंतर तिच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. 


पुजा खेडकर दोषी असल्यास कारवाई करावी, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची मागणी 



पुजा खेडकर दोषी असल्यास कारवाई करावी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर पुजा खेडकरची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील राष्ट्रीय दृष्टीहीन संघाने केली आहे. 


 


संबधित बातम्या: IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणाचे अहमदनगर कनेक्शन समोर; दिव्यांग प्रमाणपत्र देणारे रुग्णालय नगरचं, अभिलेख तपासणीत बाब समोर