Latur Gram Panchayat Election : साधारण आपण पाहतो की ग्रामपंचायत असो वा कुठलंही इलेक्शन असो, त्यात विजय मिळवल्यानंतर गावभर जल्लोष केला जातो. मात्र लातूरमधील एका गावानं वेगळ्या गोष्टीचा जल्लोष साजरा केलाय. ग्रुप ग्रामपंचायत नको स्वतंत्र ग्रामपंचायत हवी या मागणीसाठी बोंबळी (बुद्रुक) येथील ग्रामस्थांनी मतदानावरच बहिष्कार टाकला. शंभर टक्के बहिष्कार यशस्वी केल्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोष केला. 


शंभर टक्के मतदान व्हावं यासाठी प्रशासन दिवसरात्र मेहनत करत असते. मात्र ग्रुप ग्रामपंचायत नको स्वतंत्र ग्रामपंचायत हवी या मागणीसाठी बोंबळी (बुद्रुक) येथील ग्रामस्थांनी मतदानावरच बहिष्कार टाकला होता. हा बहिष्कार  शंभर टक्के यशस्वी केल्यानंतर गावकऱ्यांनी आनंद साजरा केला.  


गावकऱ्यांनी केला एकतेचा जल्लोष


स्वतंत्र ग्रामपंचायत साठी बोंबळी (बुद्रुक) ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार  टाकला होता . गावातून एकही मतदान करण्यात आले नाही. मतदानाची वेळ संपल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. 


देवणी तालुक्यातील बोंबळी (बुद्रुक) या गावातील गावकऱ्यांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी आज होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर पूर्णतः बहिष्कार टाकला. गावामध्ये सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाची पूर्ण यंत्रणा दाखल झाली होती. गावकऱ्यांनी आपल्या मागणीसाठी एकी दाखवत बहिष्कार शंभर टक्के यशस्वी केला. तालुक्याचे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी गावांमध्ये येऊन लोकांना मतदान करण्याचे आव्हान केले मात्र गावकरी आपल्या मतावर ठाम राहिले. 


मतदानाची वेळ संपताच सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन गावामध्ये रॅली काढत जल्लोष साजरा केला  तसेच स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याची मागणी जोपर्यंत प्रशासनाकडून पूर्ण होत नाही तोपर्यंत येणाऱ्या जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे या जल्लोष रॅलीमध्ये गावकऱ्यांनी सांगितले आहे.

राज्यभरात प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान


राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.  राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या,  तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 7 हजार 135  ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30  ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. 


ही बातमी देखील वाचा


Maharashtra Gram Panchayat Election 2022: ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 74 टक्के मतदान, 20 डिसेंबरला लागणार निकाल, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती झालं मतदान