Mumbai: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून भेसळयुक्त पनीरची विक्री होत असल्याचा प्रकार समोर येत असून पुण्यातून अन्न व औषध विभागाने 1400 किलो पनीर जप्त करत कारवाईही केली होती. या घटनेचे पडसाद आता विधानसभेतही उमटताना दिसत आहेत. यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजप आमदाराने बनावट पनीर घेतच विधीमंडळात एन्ट्री मारली. आपल्या अन्नातले 70-75 % पनीर कृत्रीम असल्याचे सांगत आज लक्षवेधीत अन्न् व औषध प्रशासनासमोर ते हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचं त्यांनी ABP माझाला सांगितलं. काही दिवसांपूर्वी तिरुपतीच्या प्रसादात पोर्क लार्ड असल्याचं समोर आल्यानेही मोठी खळबळ उडाली होती. म्हणत भाजप आमदार विक्रमसिंह पाचपूते यांनी प्रशासनावर बोट ठेवले. ( Paneer)
नक्की प्रकरण काय?
राज्यात बनावट अन्नपदार्थांवरून अनेकदा चिंता व्यक्त होताना दिसते. कारवायाही होतात मात्र, कारवाई म्हणून केवळ गुन्हा दाखल करण्यापलिकडे काहीच कारवाई होत नाही. अन्न व औषध प्रशासनात अधिकारी वर्ग नसल्याने मोठी छापेमारी एफडीए करू शकत नसल्याचं आमदार विक्रमसिंह पाचपूते म्हणाले. ते म्हणाले,माझी आज लक्ष्यवेधी आहे .सिंथेटिक पनीर विकले जाते, यासंदर्भात परवानगी नाही आहे .चीज ॲनालाॅग बनवण्याची परवानगी दिली आहेअन्नात आपल्या आर्टिफिशिअल पनीर आहे .मी अध्यक्षांना हे पनीर द्यायला आणले आहे ७०-७५ टक्के पनीर आर्टिफिशिअल आहे, मला तज्ज्ञांनी सांगितलं .तुम्ही ओळखून दाखवा कोणतं पनीर खरं आहे.पोर्क लार्ड तिरुपतीच्या प्रसादात आलं होतं .प्रोटिन सोर्स पनीर नसून तो तेलाचा गोळा आहे .होळीचा सण आहे, अशात केटरींग मध्ये पनीर टिक्का बिर्याणी खातात .दुर्दैवानं टेस्टिंग करायचं म्हंटलं तर सोय नाही .आयोडिनची टेस्ट स्टार्च शोधण्यासाठी आहे .१० तारखेला प्रश्न लागला होता .एफडीएनं छापेमारी केली आणि त्यात पनीर सापडले होते जे आर्टिफिशिअल होतं. अधिकारी वर्ग नाही त्यामुळे मोठी छापेमारी एफडीए करु शकत नाही.कायद्यात तरतूद करावी लागणार आहे .भेसळयुक्त पनीर दिलं तर ब्रॅंडिंग संदर्भात गुन्हा दाखल होऊ शकतं यात बाकी काहीही होऊ शकत नाही.अशात कायद्यात बदल केले पाहिजे .हा जीवाचा प्रश्न आहे गांभीर्याने विषय घ्यावा लागणार आहे, असेही पाचपूते म्हणाले.
हेही वाचा: