Latur Crime News : चार तासापूर्वी लातूरमधील आंबेजोगाई रोडवर एका 35 वर्षी व्यक्तिला पाच लोकांनी बेदम मारहाण केली होती. रस्त्यावर झालेल्या महाराणीची व्हिडिओ काही वेळातच लातूरमध्ये (Latuir) व्हायरल झाले होते. या घटनेनं लातूर शहर हादरलं होतं. यानंतर पोलिसांनी अवघ्या चार तासातच कारवाई करत या घटनेतील पाचपैकी चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. ज्या ठिकाणी आरोपींनी मारलं होतं तिथूनच मारत त्यांची धिंड शिवाजीनगर पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आली.
दहशत माजवणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मारहाण करुन दहशत माजवणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतल्यानंतचर आरोपींनी ज्या ठिकाणी मारहाण केली, त्या ठिकाणाहून त्यांची धिंड काढत लातूरमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यावेळी बरोबर होतं. अवघ्या तीन तासात त्यांनी यातील चार आरोपींना जेरबंद केले आहे.
पतीने पत्नीची दगडाने ठेचून केली हत्या
किरकोळ वादातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना कासा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या थेरौंड येथे समोर आली आहे. गुलाब सुरेश भोईर असं 52 वर्षीय मयत पत्नीचे नाव असून तिचं काल संध्याकाळी उशिरा पती सुरेश भोईर यांच्यासोबत किरकोळ वाद झाला. यानंतर रागात असलेल्या आरोपी सुरेश भोईर यांनी पत्नीची दगडाने ठेचून हत्या केली असून यानंतर कासा पोलिसांनी आरोपी सुरेश भोईर यांना अटक केली आहे . आरोपी विरोधात 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कासा पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बनावट आधार कार्डद्वारे सोलापुरात राहणाऱ्या 12 बांगलादेशी नागरिकांना अटक, गारमेंट कारखान्यात करत होते काम