Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज (रविवारी) सकाळच्या सुमारास निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला आहे. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. लता दीदींच्या निधनानंतर कोल्हापूरातूनदेखील हळहळ व्यक्त केली जात आहे.
लता दीदींचे कोल्हापूरशी खास नाते आहे. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर कोल्हापूरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. लता दीदी कोल्हापूरात दहा वर्ष भाड्याच्या घरात राहत होत्या. तीन खोल्यांच्या या छोटेखानी भाड्याच्या घरात लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर या भावंडांचे बालपण गेले. त्यावेळी लता दीदी लक्ष्मण कारेकर यांच्या घरात राहत होत्या. त्यामुळे आज लता दीदींच्या निधनानंतर कारेकर कुटुंबीयांनी लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
लता दीदी गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी मुंबईत असल्या तरी त्यांचे बालपण कोल्हापूरात गेले आहे. तसेत रेकॉर्डिंग नसेल तर त्यांचा मुक्काम कोल्हापुरातच असायचा. त्यासोबत साडी, दागिने, खाण्याचे पदार्थदेखील त्या कोल्हापुरातच खरेदी करायच्या. कोल्हापुरात लतादीदींची खरेदीची हौस पूर्ण करणारी काही ठिकाणे होती. लता दीदी विशेषत: पांढराशुभ्र, दुधी, क्रिम या रंगाच्या साडी नेसायच्या. कोल्हापुरातील महादवार रोडवरील पोरे ब्रदर्स यांच्या साडीदुकानातच लतादीदी साडी खरेदी करायच्या.
संगीतक्षेत्रात गायिका म्हणून स्थिरावल्यानंतरही साडी खरेदीसाठी लता दीदींचा मोर्चा कोल्हापुरातच वळायचा. मुंबईतून कोल्हापूरला यायचे ठरले की, लतादीदी बकुळामावशींनाच पत्र लिहून कळवायच्या. लतादीदींसाठी त्यांच्याकडून जेवणाचा डब्बा यायचा.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkwar Passes Away : लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
Lata Mangeshkar: लातूरच्या औराद शहाजानी गावात मंगेशकरांच्या नावानं कॉलेज, निधीसाठी लतादीदींनी घेतला होता कार्यक्रम
Lata Mangeshkar : 'शतकांचा आवाज हरपला', अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केला शोक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha