Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा एकत्र बसून गप्पा मारत असतानाचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अजित पावर यांच्यासोबत गप्पा मारतानाचा हा फोटो स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मुलाचं पुण्यात लग्न होतं. या लग्न सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित अजित पवार, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत पाटील , दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 



 अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा गप्पा मारतानाचा फोटो पाहून आश्चर्य व्यक्त केलं जातंय. कारण हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांच्यात अनेकदा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो. असे असताना हे दोन नेते एकत्र बसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  


हर्षवर्धन पाटील कॉंग्रेसमध्ये असताना विधानसभेच्या इंदापूर जागेवरूनही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत शितयुद्ध सुरू होते. आघाडी असल्यामुळे ही जागा कोणाला द्यायची यावरून दोन्ही पक्षांत कलगीतुरा रंगत होता. इंदारपूरच्या जागेवर पहिल्यापासून लढत असल्यामुळे ही जागा कॉंग्रेसला मिळावी अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांची असायची तर अजित पवार यांच्याकडून ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात यावी अशी मागणी असायची. दरम्यान, 2019 मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. 


दरम्यान, जुलै 23021 मध्ये हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू व माजी सभापती प्रशांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे इंदापूरमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. 


महत्वाच्या बातम्या