मुंबई : राज्यातले सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची डेडलाईन आज संपणार आहे. परंतु आजही रस्त्यांची स्थिती मात्र जैसे थे अशीच आहे.


चंद्रकांत पाटील यांनी 30 ऑक्टोबर रोजी खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी आता नवी सरकारी डेडलाईन जाहीर केली होती. 15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा पाटील यांनी केला होता.

मुंबई, डोंबिवली, कल्याण, नाशिकसारख्या शहरात अनेकांचे खड्ड्यांमुळे बळी गेले आहेत. या शहरांसह राज्यातही बऱ्याच ठिकाणी अनेक रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सेल्फे विथ खड्डे ही मोहीम हाती घेतली होती. जनतेमधून आवाज उठल्यानंतर आणि विरोधकांच्या टीकेनंतर सरकारने नवी डेडलाईन जाहीर केली होती.

'महाराष्ट्रात 96,000 किमीपर्यंतचे जे पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत. त्यावर 15 डिसेंबरपर्यंत आपल्याला एकही खड्डा दिसणार नाही,' असं चंद्रकात पाटील म्हणाले होते. तसंच यंदा राज्यात प्रचंड पाऊस झाल्याने सर्वत्र खड्डे झाले, त्यामुळे आता पुन्हा नव्याने खड्डे बुजवण्याचे टेंडर काढण्यात आल्याचं पाटलांनी सांगितलं होतं.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पुणे विभागातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचं काम 88.94% पूर्ण झाल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी या संदर्भात ट्विटरवर माहिती दिली होती.

https://twitter.com/ChDadaPatil/status/940926607170113536

https://twitter.com/ChDadaPatil/status/940596643132559362

https://twitter.com/ChDadaPatil/status/938714382409744384

संबंधित बातम्या :

15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही : चंद्रकांत पाटील

स्त्यांवर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही : पाटील

यापुढे रस्त्यांवर किमान 10 वर्ष खड्डे पडणार नाहीत : चंद्रकांत पाटील

‘तातडीने खड्डे बुजवा, अन्यथा हातात चाबूक घ्यावा लागेल’


महापौरांनी रात्री उशिरा कल्याण मधील खड्डे बुजवले!


10 फूट लांब, दीड फूट खोल... नवी मुंबईत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?


पुण्यातीलही रस्त्यांचे खड्डे 'गोल गोल'


मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात


मोदी सरकारने बनवलेल्या रस्त्यांवर 200 वर्ष खड्डे पडणार नाहीत : गडकरी