मुंबई :  ड्रग्ज माफिया (Drugcase)  ललित पाटील (lalit Patil) हा श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.  तो श्रीलंकेला जाण्याआधीच त्याला साकीनाका पोलिसांनी पकडले आहे. ललित पाटीलला न्यायलयात घेऊन मुंबई पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना अटकेत असलेल्या ललित पाटीलने गौप्यस्फोट केला आहे. मी ससूनमधून पळून गेलो नाही तर मला पळवलं गेल्याचा गौप्यस्फोट ललित पाटीलने केला आहे. रूग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आलं असता ललित पाटीलने एबीपी माझाच्या कॅमे-याकडे पाहात मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं. कोणाकोणाचा हात आहेे ते सर्व सांगेन असं ललित पाटील म्हणाला. 


मला पळवण्यामागे कोणा-कोणाचा हात लवकरच सांगणार


ललित पाटीलने पोलीसांच्या गाडीत बसण्याअगोदर प्रतिक्रिया दिली आहे.    मी लवकरच मीडियाशी बोलेल . मी ससूनमधून पळून गेलो नाही तर मला पळवलं आहे. मला पळवण्यामागे कोणा-कोणाचा हात आहे, हे लवकरच सांगणार आहे, असे ललित पाटील म्हणाला.  ललित पाटीलला बंगळुरूमधून पळून जाताना अटक झाली. ललित पाटीलसह त्याच्या साथीदारालाही अटक केली आहे. ललित पाटील आणि त्याच्या साथीदाराला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे. मुंबई पोलीस दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.


पळ काढल्यानंतर ललित पाटील नाशिकमध्येच 


ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर ललित पाटील अनेक दिवस होता नाशिकमध्येच  होता.  नाशिक पोलीस, पुणे पोलीस तसेच मुंबई पोलीस मागावर असताना देखील ललित पाटील नाशिकमध्येच कसा? त्याला होता राजकीय पाठींबा का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तपास यंत्रणांनी शोध कार्याला गती येताच नाशिकमधून त्याने पळ काढला. त्यानंतर इंदोरवरून तो गेला सुरतमध्ये गेला.  सुरतमध्ये आणि पुन्हा नाशिक धुळे औरंगाबाद करत कर्नाटकात त्याने  प्रवेश केला.


ललित पाटील आणि त्याच्या साथीदाराला अंंधेरी कोर्टात हजर करणार


 ड्रगमाफिया ललित पाटील हा श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तो श्रीलंकेला जाण्याआधीच त्याला साकीनाका पोलिसांनी पकडला. ललित पाटीलला बंगळुरूमधून पळून जाताना अटक झाली. ललित पाटीलसह त्याच्या साथीदारालाही अटक केलीय. ललित पाटील आणि त्याच्या साथीदाराला अंंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे. मुंबई पोलीस दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देणारल आहेत.


ललित पाटीलला पळवण्यात राजकीय नेते सहभागी


ललित पाटीलला पळवण्यात राजकीय नेते सहभागी आहेत.  ललित पाटील सोबत दादा भुसे आणि शंभुराजे देसाई यांची नार्को टेस्ट करा,अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. ललित पाटील प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी झाली पाहिजे. दादा भुसे, शंभुराज देसाई, ससूनचे डीन, त्याला पळून जाण्यास मदत करणारे डॉक्टर यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. ससूनमधून पळून जाऊन तो नाशिकमधे काही दिवस होता. मोठी रक्कम आणि दागिने घेऊन तो नाशिकमधे कसा राहिला याची माहिती देवेंद्र फडणविसांनी द्यावी  लागेल, असे अंधारे म्हणाल्या.  


कशी केली अटक?


 साकीनाका पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात  ललित पाटील अलगद जाळ्यात फसला. साकीनाका पोलीसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला ललित पाटीलने नव्या नंबरवरून कॉल केला आणि तिथेच तो फसला. त्यानंकर साकीनाका पोलीसांनी प्रचंड गोपनीयता बाळगत  तीन पथके ललित पाटीलच्या शोधासाठी तयार केली. दरम्यान ललित पाटील आणि ताब्यात असेलल्या आरोपीचे रोज संभाषण होत असे.त्यावरून पोलिसांना ललित पाटीलच्या हालचालींविषयी माहिती मिळत होती.  पुणे,नाशिक, इंदोरवरून तो गेला सुरतमध्ये गेला. त्यानंतर पुन्हा नाशिक धुळे, औरंगाबाद करत कर्नाटकात त्याने  प्रवेश केला. या  सर्व प्रवासादरम्यान ललित हा अटक असलेल्या आरोपीच्या संपर्कात होता. अखेर  एका हॉटेलमध्ये तो थांबलेला असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.