मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी एक मोठी बातमी आहे. या योजनेचा शुभारंभ रक्षाबंधनाच्या दिवशी (Raksha Bandhan) होणार असून त्या दिवशी दोन महिन्यांचे एकत्रित हप्ते खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात एकत्रित 3000 रुपये जमा होणार आहेत. 19 ऑगस्ट रोजी ज्या महिलांच्या कागदपत्रात काहीच अडचण नाही अशा सर्व महिलांना 3 हजार रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. राज्यातील दीड कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे.
रक्षाबंधनाला राज्य सरकारकडून महिलांसाठी विशेष गिफ्ट मिळणार आहे. राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या शुभारंभ रक्षाबंधनाच्या दिवशी केला जाणार आहे. त्याच दिवशी दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष काय?
- महाराष्ट्र रहिवासी
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
कोणती कागदपत्रं लागणार?
- आधारकार्ड
- रेशनकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
- अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
- लग्नाचे प्रमाणपत्र
- योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपवर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.
मंत्रिमंडळ बैठकीत नवीन नियम आणि अटी व शर्ती
1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे.
2. एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे
3. ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे.
4. केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.
5. नव विवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.
6. ओटीपी चा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा
ही बातमी वाचा: