Kokan Railway: कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल 37 गाड्यांचा वेग आजपासून मंदावणार आहे. कारण आजपासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. त्यामुळे गाड्यांचा वेग 40 किलोमीटर प्रतितास असेल. पावसाळ्यात प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ही वेगमर्यादा करण्यात आली आहे.
कोकण रेल्वेने मान्सूनसाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सर्वच गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. हे नवे वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्टोबरसाठी लागू असेल. या कालावधीत रेल्वेची वेगमर्यादा 40 ते 90 प्रतितास असणार आहे. तसेच सर्वच धोकादायक ठिकाणी 24 तास गस्त असणार आहे. कोकण रेल्वेने ज्या कालावधीसाठी रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे, त्या कालावधीत गणेशोत्सव सुद्धा येतो आहे. त्यामुळे वेळापत्रकातील कोकणवासियांसाठी महत्त्वाचे आहे.
कोकण रेल्वेचे मान्सून कालावधीतील (10 जून ते 10 ऑक्टोबर) वेळापत्रक
मुंबई ते मंगलोर
ही गाडी सीएसएमटी येथून रात्री 10.02 वाजता सुटून ठाण्यात 10.45 वाजता, रत्नागिरी पहाटे 4.10, कणकवली सकाळी 6.10 वाजता, मंडगावला 8.50 तर मंगळूरला दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४० वाजता पोहोचेल. परतीसाठी मंगळूर येथून सायंकाळी 4.35 वाजता सुटून मंडगावला रात्री 10 वाजता, कणकवली रात्री 11.51, रत्नागिरी मध्यरात्री 2.25, ठाणे सकाळी 9.40 तर सीएसटीएमला सकाळी 10.35 वाजता पोहोचेल.
कोकण कन्या एक्सप्रेस
मुंबई सीएसटी येथून रात्री 11.5 वाजता सुटेल. दादरला 11.20, ठाणे 11.50, रत्नागिरी पहाटे 5.30, वैभववाडी सकाळी 7.06, कणकवली7.40, सिंधुदुर्ग 7.57, कुडाळ 8.10, सावंतवाडी 8.42 वाजता पोहोचेल. परतीसाठी मडगाव येथून सायंकाळी ६ वाजता सुटून सावंतवाडीला 7.30, कुडाळ 7.52, सिंधुदुर्गनगरी 8.04, कणकवली 8.56, रत्नागिरी 10.55, ठाणे पहाटे 4.22 , दादर 5.12, सीएसटीएमला 5.40 वा. पोहोचेल.
सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस
दादर येथून मध्यरात्री 12.05 सुटून ठाण्याला 12.35, रत्नागिरीला सकाळी 7.50, वैभववाडी 9.30, कणकवली 10.16, सिंधुदुर्ग 10.38, कुडाळ 10.52 तर सावंतवाडीला 11.30 वा. पोहोचेल. परतीसाठी सायंकाळी 5.55 वाजता सुटून कुडाळ 6.14,सिंधुदुर्ग 6.26, कणकवली 6.46, वैभववाडी 7.20, दादरला सकाळी 6.40 वाजता पोहोचेल.
तेजस एक्सप्रेस
मुंबईहून 5.50 वाजता पहाटे सुटून दादर 6.02, ठाणे 6.25, रत्नागिरी 11.50, कुडाळ 2.32 वाजता पोहोचेल. परतीसाठी मंडगाव येथून दुपारी 12.25 वा. सुटून कुडाळला दुपारी 2.00 रत्नागिरी 5.25 दादरला 11.30 वा. पोहोचेल
दिवा सावंतवाडी
ही गाडी दिवा येथून सकाळी 6.25 वाजता सुटून रत्नागिरी येथे दुपारी २ वाजता, वैभववाडी 3.55, कणकवली 4.34, कुडाळ 5.11 तर सावंतवाडीला 6.30 वा. पोहोचेल. परतीसाठी सकाळी सावंतवाडी येथून 8.15 वाजता सुटून कुडाळ 8.38, कणकवली 9.10, वैभववाडी 9.55, रत्नागिरी 12.5 तर दिवा रात्री 8.10 वा. पोहोचेल.
मांडवी एक्सप्रेस
मुंबईतून सकाळी 7.10 वा. सुटून दादर 7. 25,ठाणे 7.55, रत्नागिरी 2.40, वैभववाडी 4.58, कणकवली 5.32, कुडाळ 6.16, सावंतवाडी 7.02 मडगावला रात्री 9.45 वा पोहोचेल. मुंबईकडे जाताना मडगाव येथून सकाळी 8.30 वाजता सुटून सावंतवाडीला 10 वाजता, कुडाळ 10.22, सिंधुदुर्ग 10.38, कणकवली 11.00, वैभववाडी 11.30, रत्नागिरी दुपारी 2, ठाण्याला रात्री 8.37, तर दादरला 9.07 वा पोहोचेल.
याचबरोबर लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
हे ही वाचा :