Konkan Loksabha Election Result : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election 2024) महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीचा अक्षरशः धुव्वा उडवत एकहाती यश मिळवलं आहे. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी अपेक्षित यश मिळवतानाच महायुतीला पराभवाची धूळ चारली आहे. महाराष्ट्रामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ठाकरे गट दहा जागांवर आघाडीवर आहे. शरद पवार गट सात जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 12 जागांवरती आघाडीवर आहे. सांगलीमधून काँग्रेसचेच बंडखोर उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. त्यामुळे एक प्रकारे महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिला आहे. 






दुसरीकडे मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मुंबईतील सहापैकी पाच जागा जिंकण्यात महाविकास आघाडीला यश आलं आहे. मात्र, कोकणी भागामध्ये ठाकरेंना धक्का बसला आहे. 






कोकण पट्ट्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे उमेदवार अपयशी ठरले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विनायक राऊत पराभूत झाले आहेत. याठिकाणी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजयी खेचून आणला आहे. ते पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणामध्ये होते. रायगडमध्ये एकमेव अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा पराभव केला. पालघरमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. ठाणेमध्ये सुद्धा शिंदे गटाने मोठा विजय मिळवला असून त्या ठिकाणी नरेश मस्के यांनी ठाकरेंच्या राजन विचार यांचा पराभव केला. 






दुसरीकडे, अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात ठाकरेंना यश मिळालं असलं, तरी कोकण हा शिवसेनेचा नेहमीच बालेकिल्ला मानला गेला आहे. मात्र याच कोकणपट्ट्यामध्ये ठाकरे यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. 






इतर महत्वाच्या बातम्या