Mumbai South Lok Sabha Election Result 2024 : मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीची गणितं ज्या मतदारसंघावर अवलंबून आहेत, ज्या मतदारसंघावर अवलंबून आहे, तो दक्षिण मुंबई मतदारसंघ ठाकरेंना स्वतःकडे राखण्यात यश मिळालं आहे. दक्षिण मुंबईतून ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंत (Arvind Sawant) विजयी झाले आहेत. विद्यमान आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांचा सावंतांनी दारुण पराभव केला आहे. 

देशाची आर्थिक राजधानी म्हणजे, मुंबई (Mumbai News). या आर्थिक राजधानीतील संपूर्ण आर्थिक उलाढालींचं गणित दक्षिण मुंबईवर (South Mumbai Lok Sabha Election Result 2024) अवलंबून आहे. पूर्वीची मूळ मुंबई म्हणजेच, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ (South Mumbai Lok Sabha Constituency). हा मतदारसंघ कष्टकरी कामगारांच्या गिरणगावासह अगदी उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिलपर्यंत सर्व वर्गातील लोकांना सामावून घेतो. याच मतदारसंघात दोन कडवट शिवसैनिकांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली.

यंदाच्या लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना उतरवण्यात आलं. 2019 आणि 2024 सलग दोनदा अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतील मतदारांनी संसदेत पाठवलं. यंदाची निवडणूक आजवरच्या इतिहासात तशी वेगळी ठरली. यंदा शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे संपूर्ण लोकसभा निवडणूक खरी ठाकरे विरुद्ध शिंदे अशीच झाली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच अरविंद सावंतांसमोर तगडा उमेदवार देण्यासाठी महायुतीत मोठा खल झाला. अखेर दक्षिण मुंबईतील लढत झाली ती, दोन कडवट शिवसैनिकांमध्ये... अरविंद सावंतांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं. मतदानाचा निकाल (MumbaiLok Sabha Election Result 2024) आता अवघ्या काही दिवसांवर आला असून या लढतीत कोण बाजी मारणार हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. 

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल (South Mumbai Lok Sabha Result 2024)

उमेदवाराचं नाव (Rahul Shewale vs Anil Desai) पक्ष (Shinde Group vs Thackeray Group) विजयी की पराभूत?
अरविंद सावंत (विद्यमान खासदार) शिवसेना ठाकरे गट विजयी
यामिनी जाधव (विद्यमान आमदार) शिवसेना शिंदे गट पराभूत

ठाकरेंची सहानुभूती की, महायुतीची शिष्ठाई, कुणाचं पारडं जड ठरणार? 

यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. यंदा शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. शिवसेनेत फूट पडली आणि दोन गट झाले. एक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांचा पक्ष आणि दुसरा शिवसेनेतील प्रबळ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंचा पक्ष. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या दक्षिण मुंबईत आपला खासदार बसवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे यांच्यात चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 

2019 लोकसभा निवडणुकांचा (Mumbai South Central Lok Sabha Constituency)

2019 लोकसभा उमेदवार आणि पक्ष मतं विजयी/पराभूत 
अरविंद सावंत (शिवसेना) 4,21,937 विजयी 
मिलिंद देवरा (काँग्रेस) 3,21,870 पराभूत 

South Mumbai Constituency : कोणत्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश? 

विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मलबार हिल, मुंबादेवी, भायखळा, शिवडी, वरळी, कुलाबा या मतदारसंघांचा समावेश होते. मलबार हिल मतदारसंघातून भाजपाचे मंगलप्रभात लोढा आमदार आहेत. तर, कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचे राहुल नार्वेकर करत असून ते विधानसभेचे अध्यक्षही आहेत. भायखळा मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव विजयी झाल्या होत्या, त्या आता शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. मुंबादेवी इथून काँग्रेसचे अमिन पटेल विधानसभेत आमदार म्हणून गेले आहेत. शिवडी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अजय चौधरी तर वरळीतून आदित्य ठाकरे आमदार झाले आहेत.

मतदानाची टक्केवारी 

दक्षिण मुंबई विधानसभा मतदारसंघ 2024 लोकसभा निवडणूक 
वरळी  50.32 टक्के   
शिवडी 51.86 टक्के    
भायखळा 52.72 टक्के 
मलबार हिल 51.77 टक्के    
मुंबादेवी  50.04 टक्के    
कुलाबा 43.68 टक्के    

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

विधानसभा मतदारसंघ आमदाराचं नाव  पक्ष 
वरळी नगर विधानसभा मतदारसंघ आमदार आदित्य ठाकरे शिवसेना (ठाकरे गट)
शिवडी विधानसभा मतदारसंघ आमदार अजय चौधरी शिवसेना (ठाकरे गट)
भायखळा विधानसभा मतदारसंघ आमदार यामिनी जाधव  शिवसेना (शिंदे गट)
मलबार हिल विधानसभा मतदारसंघ आमदार मंगलप्रभात लोढा भाजप
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ आमदार अमिन पटेल काँग्रेस
कुलाबा विधानसभा मतदारसंघ आमदार राहुल नार्वेकर भाजप 

दक्षिण मुंबई मतदारसंघातील राजकीय वैशिष्ट्य 

देशाची आर्थिक राजधानी म्हणजे, मुंबई. या आर्थिक राजधानीतील संपूर्ण आर्थिक उलाढालींचं गणित दक्षिण मुंबईवर अवलंबून आहे. पूर्वीची मूळ मुंबई म्हणजेच, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ. या भागात सर्व प्रशासकीय इमारती, शासकीय कार्यालयं, राजकीय नेत्यांचे बंगले, उद्योजक, व्यापाऱ्यांच्या गगनचुंबी इमारती, एवढंच नाहीतर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या, महत्त्वाच्या आणि मोठ्या बँकांची मुख्यालयं आणि जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ठ होणाऱ्या एक-दोन नव्हे अनेक इमारतींचा सहवास लाभलेला हा मतदारसंघ. हा मतदारसंघ कष्टकरी कामगारांच्या गिरणगावासह अगदी उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिलपर्यंत सर्व वर्गातील लोकांना सामावून घेतो. पण आता या मतदारसंघाचा चेहरा पुरता बदलला आहे. आधी कामागार नेत्यांचं वर्चस्व असलेला मतदारसंघावर काही काळ काँग्रेसचं प्रभुत्व होतं. तर, सध्या हा मतदारसंघ ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 1952 पासून 1967 पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र 1967 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी जनता दलतर्फे लढून हा मतदारसंघ काँग्रेसकडून खेचून आणला होता. त्यानंतर मात्र या मतदारसंघात अनेक मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. 1984 पासून 1996 पर्यंत इथे काँग्रेसच्या मुरली देवरा यांचं वर्चस्व होतं. मुरली देवरांनी बराच काळ मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला. मग 1996 मध्ये भाजपच्या जयवंतीबेन इथे निवडून आल्या. मात्र 1998 मध्ये मुरली देवरा विजयी झाले. मग 1999 मध्ये पुन्हा जयवंतीबेन मेहतांनी विजय मिळवला. 2004 मध्ये मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि 2014 पर्यंत ही जागा काँग्रेसकडे राहिली.  मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत मिलिंद देवरा यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे अरविंद सावंत लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. अरविंद सावंत यांनी सुमारे सव्वा लाखांपेक्षा जास्त मतांनी मिलिंद देवरांचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या 2019 च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्यावतीनं अरविंद सावंत यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं. त्यांनी मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून आणला. 

शिवसेनेचे आणि सध्या ठाकरे गटात असलेले खासदार अरविंद सावंत यांनी सलग तीनवेळा लोकसभेचं मैदान मारलं आहे. 2014 आणि 2019 अशी सलग दोनदा अरविंद सावंत यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. त्याचप्रमाणे 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा अरविंद सावंतांनी दक्षिण मुंबईचा गड राखला. तर यामिनी जाधव भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. पण अरविंद सावंतांनी मैदान राखत ठाकरेंच्या पारड्यात आणखी एक मतदारसंघाची भर टाकली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mumbai South Central Lok Sabha Result 2024: ठाकरे की, शिंदे? शिवसेना भवनाच्या दारात गुलाल कुणाचा? लोकसभा निवडणूक निकाल एका क्लिकवर