कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं. 


काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती. अखेर या निवडणुकीत महाविकास आघाडी मोठा विजय मिळवला. 


भाजपने या निवडणुकीत प्रचंड जोर लावला होता. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांसारख्या दिग्गजांनी इथे प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळे कोल्हापुरातील महाविकास आघाडीचा विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. 


कोल्हापूर निकालाचा थोडक्यात अर्थ


1) कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या एकीचे बळ दिसून आले


2) शिवसैनिक महाविकास आघाडीच्या उमेदवारसोबत कायम राहिला


3) वैयक्तिक पातळीवर जाऊन केलेली टीका कोल्हापूरकरांच्या जिव्हारी


4) प्रचारात काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये याचा धडा मतदारांनी भाजपाला दिला


5) हिंदुत्ववादी मतांचा मतदारसंघ असूनही भाजपला नाकारलं


6) चंद्रकांत जाधव यांचे राजकीय वैर कुणाशीही नव्हते


7) भाजपच्या जिल्ह्याच्या बाहेरुन आलेल्या टीकेला मतातून उत्तर मिळालं


संबंधित बातम्या