कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा 18,901 मतांनी विजय झाला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं. 


काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती. अखेर या निवडणुकीत महाविकास आघाडी मोठा विजय मिळवला. 


एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. 17 फेऱ्यांमध्ये जयश्री जाधव यांनी आघाडी कायम ठेवली. तर नऊ फेऱ्यांमध्ये भाजपचे सत्यजीत कदम आघाडीवर होते. अखेर जयश्री जाधव यांचा (18,901 मतं) मोठा मताधिक्याने विजय झाला. जयश्री जाधव यांना जवळपास 96 हजार 226 मतं मिळाली. तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना 77 हजार 426 मतं मिळवता आली. 



कोल्हापूर पोटनिडणुकीचा फेरीनिहाय निकाल 


पहिली फेरी  - कसबा बावडा 
जयश्री जाधव - 4856 मते
सत्यजीत कदम -  2719 मते
या फेरीतील आघाडी - 2719 मते
-------------


दुसरी फेरी - कसबा बावडा
जयश्री जाधव – 5515 मते
सत्यजित कदम – 2513 मते
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी - 3002 मते
दुसऱ्या फेरीअखेर एकूण आघाडी - 5139 मते
-------------


तिसरी फेरी - कसबा बावडा, न्यू पॅलेस
जयश्री जाधव – 4928 मते
सत्यजित कदम – 2566 मते
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी - 2362 मते
तिसऱ्या फेरीअखेर एकूण आघाडी - 7501 मते
-------------


चौथी फेरी - न्यू पॅलेस, पोलीस लाईन 
जयश्री जाधव - 3709 मते
सत्यजित कदम - 3937 मते
या फेरीत सत्यजित कदम यांना 228 मतांचे लीड
चौथ्या फेरीअखेर एकूण आघाडी - 7283 मते
-------------


पाचवी फेरी - कदमवाडी, जाधववाडी-4
जयश्री जाधव - 3673 मते
सत्यजित कदम - 4198 मते
या फेरीत सत्यजीत कदम यांना आघाडी - 525 मते
पाचव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 6758 मते 
-------------


सहावी फेरी 6 - जाधववाडी-2, मुक्त सैनिक वसाहत, विचारेमाळ, सदर बझार-4
जयश्री जाधव - 4689 मते
सत्यजित कदम: 2972 मते
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी : 1717 मते
सहाव्या फेरीअखेर एकूण आघाडी : 8475 मते 
------------- 


सातवी फेरी - सदर बझार-5, मुक्त सैनिक वसाहत, विचारेमळा, सदर बझार -2
जयश्री जाधव - 3632 मते
सत्यजित कदम - 2431 मते
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी -1201 मते
सातव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 9676 मते 
-------------


आठवी फेरी - रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, एसटी स्टॅन्ड, न्यू शाहुपूरी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क
जयश्री जाधव - 2981 मते
सत्यजित कदम - 3505 मते
या फेरीत सत्यजीत कदम यांना आघाडी - 524 मते
आठव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 9152 मते
-------------


नववी फेरी - ताराबाई पार्क  बूथ, नागाळा पार्क 
जयश्री जाधव - 2744 मते 
सत्यजीत कदम - 2937 मते
या फेरीत सत्यजीत कदम यांना आघाडी - 193 मते
नवव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 8959 मते 
-------------


दहावी फेरी - ताराबाई पार्क 6 बूथ, शाहूपुरी पाच बंगला 
जयश्री जाधव - 2868 मते
सत्यजीत कदम - 3794 मते
या फेरीत सत्यजीत कदम यांना आघाडी - 926 मते
दहाव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 8073 मते
-------------


अकरावी फेरी - सायिक्स एक्स्टेन्शन, टाकाला
जयश्री जाधव - 2870 मते
सत्यजीत कदम - 2756 मते
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी - 114 मते
अकराव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 8187 मते
-------------


बारावी फेरी - राजारामपुरी, उद्यमनगर, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी,रविवार पेठ
जयश्री जाधव -3946 मते 
सत्यजीत कदम - 2908 मते 
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी - 1038 मते 
बाराव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 9225 मते
-------------


तेरावी फेरी 
जयश्री जाधव - 4386 मते 
सत्यजीत कदम - 2432 मते 
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी - 1954 मते 
तेराव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 11179 मते
-------------


चौदावी फेरी - अकबर मोहला 3 बूथ, टाऊन हॉल, बुरुड गल्ली, शुक्रवार पेठ, तोरसकर चौक
जयश्री जाधव - 3756 मते
सत्यजीत कदम - 2669 मते
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी -1087 मते
चौदाव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 12,266 मते
-------------


पंधरावी फेरी - सिद्धार्थनगर, जुना बुधवार,पंचगंगा तालीम, खोल खंडोबा
जयश्री जाधव - 3788 मते
सत्यजीत कदम 2056 मते
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी - 1732 मते
चौदाव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 13,998 मते
-------------


सोळावी फेरी - खोल खंडोबा, शुक्रवार पेठ, शाहू उद्यान
जयश्री जाधव - 3638 मते
सत्यजीत कदम - 3847 मते
या फेरीत सत्यजीत कदम यांना आघाडी 209 मते 
सोळावी फेरीअखेर एकूण आघाडी - 13,789 मते
-------------


सतरावी फेरी - गांगावेश, बाबुजमाल 4 बूथ,रंकाळा वेश, उत्तरेश्वर पेठ,दुधाळी
जयश्री जाधव - 2795 मते
सत्यजीत कदम 3488 मते
या फेरीत सत्यजीत कदम यांना आघाडी - 693 मते
सतराव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 13,096 मते
-------------


अठरावी फेरी - मिराबाग, संध्यामठ, फिरांगाई 6 बूथ
जयश्री जाधव - 3948 मते
सत्यजीत कदम - 3189 मते
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी - 769 मते
अठराव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 13855 मते
-------------


एकोणिसावी फेरी - फिरंगाई 6 बूथ, गंजी माळ 7 बूथ 
जयश्री जाधव - 3259 मते
सत्यजीत कदम - 2974 मते
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी - 285 मते 
एकोणिसाव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 14140 मते
-------------


विसावी फेरी -संभाजी नगर,पद्माला,मंगळवार पेठ 9
जयश्री जाधव - 4366
सत्यजीत कदम - 3074
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी - 1292 मते
विसाव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 15432 मते
-------------


एकविसावी फेरी - वरुंनतिर्थ वेस 11बूथ , भवानी मंडप 3 बूथ 
जयश्री जाधव - 3452 मते
सत्यजीत कदम - 3662 मते
या फेरीत सत्यजीत कदम यांना आघाडी - 210 मते 
एकविसाव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 15,222 मते
-------------


बाविसावी फेरी - भवानी मंडप, खासबाग, मिरजकर तीकटी,वरुनतिर्थ 2 बूथ 
जयश्री जाधव - 3529 फेरी
सत्यजीत कदम - 3226 फेरी
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी - 303 मते
बाविसाव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 15,525 मते
-------------


तेविसावी फेरी - खासबाग, सुसरबाग,साठमारी,मंगळवार पेठ 4 बूथ
जयश्री जाधव - 3337 मते
सत्यजीत कदम - 2531 मते
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी- 806 मते
तेविसाव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 16331 मते
-------------


चोविसावी फेरी - मंगळवार पेठ 1 बूथ, यादव नगर, राजारामपुरी शाहू मिल, मातंग वसाहत ,यादवनगर
जयश्री जाधव - 5337मते
सत्यजीत कदम -  2830 मते
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी- 2507 मते
चोविसाव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 18838 मते
-------------


पंचविसावी फेरी - राजारामपुरी पूर्व, तोरणा नगर 
जयश्री जाधव - 2755 मते
सत्यजीत कदम - 2949 मते
या फेरीत सत्यजीत कदम यांना आघाडी - 194 मते
पंचविसाव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 18644 मते
-------------


सव्वीसावी फेरी - तोरणा नगर, शास्त्री नागर, जवाहर नागर 1 
जयश्री जाधव - 1459 मते
सत्यजीत कदम - 1303 मते
या फेरीत जयश्री जाधव यांना आघाडी - 156 मते
सव्वीसाव्या फेरीअखेर एकूण आघाडी - 18,800 मते
पोस्टलमध्ये 101 मतांची आघाडी 
जयश्री जाधव यांना अंतिम आघाडी - 18,901 मते