मुंबई : कोल्हापूरची अंजना तुरंबेकर हिने आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनची ए लायसन्स कोचिंग परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणारी अंजना ही महाराष्ट्राची पहिली महिला ठरली आहे.


देशभरात याआधी सातच महिलांना फुटबॉल प्रशिक्षक म्हणून ए लायसन्स मिळवता आलं होतं. त्यामुळे अंजनाने ए लायसन्स फुटबॉल प्रशिक्षक म्हणून मिळवलेलं यश कौतुकास्पद ठरलं आहे. अंजना ही मूळची कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातल्या बेकनाळ गावची आहे.

अंजनाने एकोणीस वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे. फिफाच्या अंडर सेव्हन्टिन विश्वचषकाच्या कालावधीत मिशन इलेव्हन मिलियन या मोहिमेची तांत्रिक प्रमुख म्हणूनही तिनं काम पाहिलं आहे.

आता ए लायसन्स फुटबॉल प्रशिक्षक या नात्यानं अंजना तुरंबेकरला आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा व्यावसायिक संघाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मिळू शकते.