Kolapur : पुरोगामी जिल्हा अशी ओळख असणाऱ्या कोल्हापुरात (Kolhapur) दिवसेंदिवस अंधश्रद्धेच्या (superstition ) घटना वाढताना दिसत आहेत. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील कुर परिसरात एक धक्कादाक घटना घडली आहे. महिलेनं पतीला सोडचिठ्ठी द्यावी म्हणून स्मशानभूमीत अघोरी प्रकार घडला आहे. स्मशानभूमीत बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल यासह एक चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये दिग्विजयला सोडचिठ्ठी दे, त्या तिघांची वाट लागू दे असा आशय लिहला आहे. या घटनेमुळं गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तसेच नागरिकांनी या घटनेबद्दल संताप देखील व्यक्त केला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
कोल्हापूरच्या (Kolapur) भुदरगड तालुक्यातील कुर परिसरात स्मशानभूमीमध्ये एक अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. पतीपासून सोडचिठ्ठी मिळावी आणि त्याच्या आयुष्यातील दोन महिलांसह तिघा जणांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं, या हेतूने एका महिलेने अघोरी प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीत बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल आणि हाताने लिहिलेला कागद सापडल्याने खळबळ उडाली आहे.
स्मशानभूमीत बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल आणि लिहिलेला कागद
दोन दिवसांपूर्वी भुदरगड तालुक्यातील कुर गावात एका नागरिकाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत तयारी सुरू होती. काही मंडळी साफसफाईसाठी स्मशानभूमीत गेले असता त्यांना बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल आणि लिहिलेला कागद मिळून आला. उत्सुकतेपोटी त्यांनी कागद उघडून वाचला असता, त्यावर एका महिलेचं नाव नमूद करून "सोडचिठ्ठी द्यावी" असा मजकूर होता. त्याचबरोबर आणखी तिघांची नावं लिहून त्यांची वाट/भट्टी लागु द्या असा मजकूर या चिठ्ठीत लिहण्यात आला असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.
अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
काही लोकांकडून अघोरी प्रकारांचा अवलंब करुन इतरांच्या शांत आणि सुखी आयुष्यात अडथळा आणण्याचे प्रकार घडत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याआधीही गावाच्या मुख्य रस्त्यांवर लिंबू-मिरची टाकण्याचे प्रकार दिसून आले होते. या नव्या घटनेमुळे गावात अनेक प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
लिंबू, काळा कपडा ते महिलांचे फोटो, भिवंडीतील स्मशानभूमीत अघोरी पूजा, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल